News Flash

माढ्यातील काही मुलं खूपच गद्दार निघाली – धनंजय मुंडे

भाजपाने २०१४ साली पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही 'सपनों का सौदागर दिला' होता. या सौदागरने सर्वांना फसवले.

माढ्यातली काही मुलं तर खुपच गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून त्यांनी दुसऱ्यांचा हात धरला. काय कमी केलं होतं पवार साहेबांनी यांच्यासाठी? इथली जनता राष्ट्रवादीवर, शरद पवारांवर प्रचंड प्रेम करणारी आहे. येत्या २३ मे रोजी माढ्यातली जनता सर्व हिशोब करेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मोहिते-पाटलांना टोला लगावला.

धनंजय मुंडे यांनी आज माढा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ कुर्डुवाडी येथे सभा घेतली. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, रश्मीताई बागल उपस्थित होते. यावेळी मुंडे म्हणाले, माढा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने डाव टाकला आहे. मात्र, हा डाव उलथून टाकण्याची धमक संजय मामांमध्ये आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने संजय मामांचं यश निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपाने २०१४ साली पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही सपनों का सौदागर दिला होता. या सौदागरने सर्वांना फसवले. भाजपाने शेतकऱ्यांना फसवले, कष्टकऱ्यांना फसवले, दलितांना फसवले, धनगरांना फसवले. मुख्यमंत्र्यांनी बारामतीत सांगितले की, भाजपाला मतदान करा पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो. आज पाच वर्षे झाली तरी तो सोनेरी दिवस उजाडला नाही. यांनी आरक्षण तर दिलेच नाही उलट धनगर समाजाच्या आरक्षणाची फाईलच हरवल्याची कबुली कोर्टात दिली. फसवणीस सरकारचा बदला घेण्याची वेळ आली असल्याचे आवाहन मुंडे यांनी उपस्थितांना केले.

दरम्यान, ज्या शहीद हेमंत करकरेंनी या देशासाठी बलिदान दिले, त्यांच्याविषयी अशी भाषा वापरणाऱ्या साध्वी प्रज्ञा सारख्या आरोपींना लोकसभेसाठी उमेदवारी देणाऱ्या भाजपा सरकारला या निर्णयाची लाज वाटत नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 4:25 pm

Web Title: some boys of madha became scab says dhanjay munde
Next Stories
1 लाव रे व्हिडिओ: लोकशाहीचा नकली टेंभा मिरवणारे पक्षाध्यक्ष; भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा
2 काँग्रेसने हिंदूंवर दहशतवाद थोपवण्याचं कारस्थान केलं – मोदी
3 ‘भाजपाकडून अपेक्षाभंग’, साहित्य आणि कला क्षेत्रात सरकारविरोधात नाराजी
Just Now!
X