काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी उद्या होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळयाला उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या शपथविधी सोहळयाला उपस्थित राहणार की, नाही ते अजून स्पष्ट झालेले नाही.

राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या या सोहळयामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटवर महात्मा गांधीच्या स्मृती स्थळावर तसेच वाजपेयी स्मृती स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहतील. मोदींच्या या शपथविधीला शेजारील देशांच्या प्रमुखांसह अन्य क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.