12 August 2020

News Flash

रजनीकांत मोदींना म्हणतात “करून दाखवलंत”

रजनीकांत यांनी ट्विटच्या माध्यमातून केले अभिनंदन

लोकसभेच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु झाल्यापासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने जोरदार मुसंडी मारली. सर्वत्र भाजपचा बोलबाला दिसून आला. २०१४ मध्ये भाजप आणि मित्रपक्षांना मोठे यश मिळाले होते. त्यापेक्षाही मोठे यश भाजपला मिळताना दिसत आहे. ५४२ मतदारसंघापैकी भाजपा तब्बल ३०० मतदारसंघांमध्ये आघाडीवर असून काँग्रेस ५० जागांवर आघाडीवर आहे. डीएमके २३, तृणमूल काँग्रेस २२, वायएसआर काँग्रेस २४ आणि शिवसेना १८ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष ११ आणि बिजू जनता दल १५ जागांवर आघाडीवर आहे. सद्यपरिस्थितीनुसार रालोआ ३४३, यूपीए ८८ आणि अन्य पक्ष १११ जागांवर आघाडीवर असून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय होतानाचे कल दिसू लागल्यानंतर देशातील आणि परदेशातील अनेक बड्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याचबरोबर एकेकाळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या पण नंतर निवडणूक न लढणाऱ्या दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी मोदींना अनोख्या शुभेच्छा दिल्या. “नरेंद्र मोदीजी, तुम्ही जो विजय मिळवला आहे, त्यासाठी तुमचे अभिनंदन! अखेर तुम्ही करून दाखवलंत”, असे ट्विट रजनीकांत यांनी ट्विटच्या माध्यमातून केले.

लोकसभा निवडणुक २०१९ मधून सुपरस्टार रजनीकांत यांनी माघार घेतली. रजनीकांत यांचा पक्ष रजनी मक्कल मंदारमचाही निवडणुकीत सहभाग झालेला नव्हता. अभिनेते रजनीकांत यांनी प्रसिद्धीपत्रक काढूनच तशी घोषणा केली होती. “या निवडणुकीत माझा किंवा माझ्या पक्षाचा कोणालाही पाठिंबा असणार नाही. चाहते आणि कार्यतर्त्यांनी आपल्या राजकीय पक्षाचं चिन्हं, झेंडा, फलक अशा कोणत्याही वस्तूचा वापर हा इतर पक्षाच्या प्रचारासाठी केला जाणार नाही. आम्ही लोकसभेऐवजी तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करू”, असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले होते. पण रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते नाराज झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2019 5:46 pm

Web Title: south superstar rajinikanth congratulates narendra modi tweeting you made it
Next Stories
1 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून नरेंद्र मोदींचं अभिनंदन
2 हिना गावितांनी गड राखला, नंदुरबारमध्ये भाजपा विजयी
3 पाक लष्कर प्रमुखांना मारलेल्या मिठया भारतीयांना आवडत नाहीत – कॅप्टन अमरिंदर
Just Now!
X