प्रशांत जोशी

शुक्रवारच्या दिवशी संगमनेरला राहुल गांधींना खूप जवळून पाहण्याचा, ऐकण्याचा आणि जाणून घेण्याचा योग आला. सभेच्या ठिकाणी ते पोहचले तिथपासून ते अगदी परत जाईपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण मी करत होतो. राहुल गांधींच्या मी इतका जवळ होतो की थोडा प्रयत्न केला असता तर मी सेल्फीही काढू शकलो असता. मात्र धनंजय मुंडे सोबत होते त्यामुळे मनाला आवर घातला. राहुल गांधी हे मला अत्यंत साधे, सरळ, सभ्य आणि इनोसंट वाटले. ना कोणताही बडेजाव ना इगो. सभा संपल्यानंतर राहुल गांधी ज्या सहजतेने कार्यकर्त्यांना भेटले त्यांचे स्वागत स्वीकारले आणि संवाद साधला त्याची सुरूवात सॉरी मेरी वजहसे आपको वेट करना पडा अशी माफी मागत केली. कार्यकर्त्यांसोबत फोटो घेताना स्वतःपेक्षा कार्यकर्ते फोटोत येत आहेत ना? याची विशेष काळजी त्यांन घेतली. भाषण करण्यासाठी २८ मिनिटे मिळाली तरीही राहुल गांधी अस्वस्थ वाटले नाहीत.

२२ मिनिटांचे अत्यंत शांत, मुद्देसुद आणि लोकांना समजेल असे सांगणारे भाषण त्यांनी केले. न्याय योजनाही इतक्या चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली की ७२ हजार खात्यात जमा होतील या विश्वासानेच आलेला व्यक्ती परत गेला असणार. भाषणात
कधीही मोदी करतात तसे द्वेषपूर्ण वाक्य नाही की सैनिक शहीद झाले म्हणून मला मत द्या मोदींप्रमाणे माझी आजी, वडील यांनी बलिदान दिले म्हणून मला मत द्या अशी मागणी नाही… मोदींना ते नेटके प्रश्न विचारतात, आम्ही काय करणार ते सांगतात…. बोलतांना कुठेही आरडा ओरड नाही… sleep of tongue नाही की… प्रत्येक शब्द आश्वासक आणि प्रामाणिक वाटेल असा…..

हं एक गोष्ट त्यांनी बदलावी असे मात्र नक्की वाटते ते म्हणजे त्यांच्या कपड्यांचा सेन्स. राहुल गांधींच्या चालण्यात रूबाबदार आहे. मात्र कपड्यांचा सेन्स जास्त सामान्य वाटतो.

राहुल गांधींमध्ये लोकांना राजीव गांधी पहायचे आहेत, स्मार्ट, रुबाबदार….. असे बदल त्यांनी केले पाहिजेत असे प्रामाणिकपणे वाटते. या देशात लोकांना नेत्यापेक्षा अभिनेता जास्त आवडतो ( उदा – मोदी ) असो या देशाने फक्त पंचा आणि उपरणे वापरणाऱ्या महात्मा गांधीना राष्ट्रपित्याचा मान दिला आहे त्यामुळे कोटींचे सोन्याचे कोट घालणा-या मोदींना साधारण राहुलही हटवणार यात शंका नाही

प्रशांत जोशी