बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी १६ महिने तुरुंगवास, १४ महिन्यांत ३६४८ किमी अंतराची पदयात्रा आणि आता मुख्यमंत्रिपद.. आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा असा राजकीय प्रवास झाला आहे. वडिलांप्रमाणेच पदयात्रा काढून लोकांशी संवाद साधत चंद्राबाबू नायडू यांचा दारुण पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५० जागा जिंकून जगनमोहन रेड्डी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे जगनमोहन हे पुत्र. २००९ मध्ये आंध्रमध्ये राजशेखर रेड्डी यांनी काँग्रेसला पुन्हा संधी मिळवून दिली होती. दुर्दैवाने हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पुत्र जगनमोहन यांनी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रिपदावर दावा केला. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हे पटले नाही. जगनमोहन यांना कोणतेही पद देण्यास काँग्रेसने टाळले. जगनमोहन यांची आई सोनियांच्या भेटीसाठी गेली असता त्यांना भेट नाकारण्यात आली. ‘सोनिया आपल्या पुत्राला पंतप्रधानपद मिळावे म्हणून प्रयत्न करतात, मग मी माझ्या मुलाला मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून प्रयत्न केल्यास काय बिघडले,’ असा सवाल जगनच्या आईने केला होता. त्यांचे हे विधान तेव्हा चांगलेच गाजले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story jaganmohan reddy
First published on: 26-05-2019 at 01:51 IST