बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. तुमचं नागपूरचं बंडल तिथेच ठेवा असं म्हणत त्यांनी उपरोधिकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दौंड, बारामती, इंदापूर हे माझं कुटुंब आहे. माझी जी काही ओळख आहे ती या मतदारसंघामुळे आणि तिथून आम्हाला निवडून देणाऱ्या लोकांमुळे आहे त्यामुळे तुम्ही तिथे येऊन आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
तुम्ही आमच्या घरात येऊन भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, काहीही गडबड करण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे हे विसरू नका. बाहेरून लोक येतात आणि बारामती दौंडच्या अंतराबद्दल बोलतात. नागपूरचे आहात तर नागपूरचेच रहा, आमच्याशी पंगा घेऊ नका. दौंड, बारामती, इंदापूर, खडकवासला, पुरंदर हा जिल्हा माझा आहे. गेली सहा वर्षे जी काय माझी ओळख आहे ती यामुळेच आहे. इथल्या लोकांमुळेच आहे. जर आमच्या घरात लुडबूड करण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा मी काही तुम्हाला ऐकणार नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 28, 2019 3:19 pm