भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभेचा गड सलग तिसऱ्यांदा राखला. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कांचन कुल यांचा दीड लाखांहून अधिक मताधिक्य घेत पराभव केला. सुळे यांना नेहमीप्रमाणे बारामती विधानसभेतून सर्वाधिक मतदान झाले. त्यापाठोपाठ दौंड, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदार संघांतूनही त्यांनी मोठय़ा प्रमाणावर मते मिळविली. या विजयानंतर सुळे यांनी आपल्या वडिलांसाठी म्हणजेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी फेसबुकवर एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी माझ्यासाठी माझे वडीलच आदर्श असल्याचा संदेश देत निवडणुकीनंतर आपल्या वडिलांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने आभार मानले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या पोस्टमध्ये एका सभेत वडीलांसाठी म्हटलेली चारोळी पोस्ट केली आहे. ‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!’ या चारोळीबरोबर त्यांनी स्वत:चे आणि शरद पवारांचे फोटो असणारा एका व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे यांनी अशीच बुलंद कहाणी असणाऱ्या बापाची मी लेक आहे असंही म्हटलं आहे. पुढे या व्हिडिओमध्ये अजित पवार यांचे औंक्षण करतानाचा सुप्रिया सुळेंचा फोटो दिसतो. तर व्हिडिओच्या शेवटी सुप्रिया सुळे यांच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो दिसतो.

girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
rahul gandhi in tamil nadu
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन एकत्र; तामिळनाडूमध्ये भाजपाला कसे रोखणार?
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
fake documents for passport
पारपत्रासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान बारामतीमध्ये काल झालेल्या मतमोजणीच्या चोविसाव्या फेरीपर्यंत सुळे यांना ६ लाख ८३ हजार ७०५ मते मिळाली होती. कुल यांनी ५ लाख २८ हजार ७११ मते मिळविली. वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांनी ४४ हजारांच्या आसपास मते मिळविली. तर, कुल यांना दौंड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. २००९ साली सुप्रिया यांनी पहिल्यांदा बारामतीमधून निवडणूक लढवली. या पहिल्या निवडणुकीत तीन लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या सुळे यांचा २०१४ मध्ये सुमारे ६९ हजार मतांनी रडतखडत विजय झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात सुळे यांचा पराजय होऊ शकतो, असे बळ कार्यकर्त्यांना देत ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती.

भाजपने या मतदारसंघात जोर लावल्याने शरद पवार आणि अजित पवार यांनीही मतदारसंघात विशेष लक्ष घातले होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. बारामती लोकसभेसाठी ६१.५४ टक्के मतदान झाले होते. एकटय़ा बारामती विधानसभेत ७० टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले होते. अपेक्षेप्रमाणे याच मतदारसंघातून सुळे यांना सर्वाधिक दीड लाखांच्या आसपास मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये सुळे पिछाडीवर होत्या. मात्र, त्यानंतर एकदम मोठे मताधिक्य घेऊन त्या शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिल्या. बारामतीसह सुळे यांनी दौंड, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघातही आघाडी घेतली.