कपिल पाटील यांच्याविरोधात बंडखोरी केल्याने कारवाई; भिवंडी शिवसेनेत अस्वस्थता

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करणारे शिवसेनेचे या भागातील नेते सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळा मामा यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. पाटील यांच्याविरोधात या मतदारसंघातील शिवसेनेच्या एका मोठय़ा गटाने आघाडी उघडली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील बंड शमविण्यासाठी या भागात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शिंदे यांच्या प्रयत्नांनतरही बंडखोरी करणारे बाळ्या मामांना तातडीने पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

eknath shinde and 40 mla joined the bjp because of fear of arrest says aditya thackeray
आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल : म्हणाले, ‘अटकेच्या भीतीनेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० गद्दार भाजपसोबत..’
eknath shinde bhavna gavli hemant patil
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
Amol Kolhe, Dilip Mohite, Shirur,
शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी
Hatkanangale
हातकणंगलेत सत्यजित पाटील सरूडकर यांच्या हाती मशाल

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेत कमालीची नाराजी आहे. भिवंडी, कल्याण महापालिका, बदलापूर नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाटील यांनी शिवसेनेविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी पाटील यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराज आहेत. काही नाराज पदाधिकाऱ्यांची मध्यंतरी कँाग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी भेट घेतल्याने युतीच्या गोटात अस्वस्थता आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कपिल पाटील यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तरीही कपिल पाटील यांच्याबाबत शिवसेनेत नाराजी कायम आहे.

पाटील यांचे कट्टर विरोधक सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. पाटील यांना निवडून देणे म्हणजे शिवसेना संपविणे असा आक्रमक प्रचार म्हात्रे यांनी सुरू केला असून त्यामुळे पक्षाने तातडीने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. भिवंडीतील बंडाची मातोश्रीवरून दखल घेण्यात आली होती. पाटील यांना पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. मात्र, अर्ज मागे घेण्याची प्रतीक्षा न करता म्हात्रे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नाही. त्यामुळे माझी उमेदवारी म्हणजे बंडखोरी नाही. खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार उभा करेल, असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी जाहीरपणे दिला होता. मीदेखील भिवंडी परिसरातील अस्वस्थ शिवसैनिकांची भावना बोलून दाखवीत आहे.

-सुरेश म्हात्रे, बंडखोर उमेदवार.