पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भजपाचा प्रत्येक नेता ममता बॅनर्जींविरूध्द काही ना काही बोलत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून नंदीग्रामचे उमेदवार सुवेन्दु अधिकारी यांनी म्हटले आहे की, तृणमूल कॉंग्रेस पश्चिम बंगालला दुसर्‍या काश्मीरमध्ये बदलण्यास उत्सुक आहे.

अधिकारी हे आधी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. या निवडणुकीत ते नंदीग्राम मतदारसंघात त्यांचा सामना करणार आहेत.

काल मुहळपारा, बहाला येथील एका सभेत बोलताना श्री. अधिकारी म्हणाले, “श्यामा प्रसाद मुखर्जी नसते तर हा देश इस्लामीक राष्ट्र बनला असता आणि आपण बांगलादेशात राहात असतो. जर टीएमसी सत्तेत आले तर पश्चिम बंगालचे काश्मीर होईल. ”

काही आठवड्यांपूर्वी १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसवर पश्चिम बंगाल बांगलादेशात बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.