15 October 2019

News Flash

यापुढे परिवारवादी पक्षांचे नामोनिशाण राहणार नाही – शाह

यंदाच्या लोकसभा निवडणूक निकानंतर जनतेनं सर्वांना योग्य उत्तर दिले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणूक निकानंतर जनतेनं सर्वांना योग्य उत्तर दिले आहे. यापुढे परिवारवादी पक्षांचे नामोनिशाण राहणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिली. भाजपाच्या विजयानंतर आज सायंकाळी पक्ष मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शाह बोलत होते. यावेळी शाह यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या कामगिरीवर आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. बंगालमध्ये इतिहासात प्रथमच भाजपाला ऐवढं यश मिळाले आहे.

आजचा हा विजय ऐतिहासिक असून भारताच्या जनतेचा आहे. प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. तब्बल ५० वर्षांनंतर एखाद्या नेत्याने दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवले आहे, असे शाह म्हणाले.

काय म्हणाले शाह –

– आम्ही २०१४ ते २०१९ पर्यंत सबका साथ सबका विकासवर काम केलं.
– हा विजय मोदींच्या लोक प्रियतेचा विजय आहे.
– गरीबांचा जिवनस्तर उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश.
– मोदींनी आपली लोकप्रियतेसोबत तुफानी दौरा केला त्याचं यश
– दिल्लीच्या कार्यकारणीत महागठबंधानाची गोष्ट झाली तेव्हा मी कार्यकर्त्यांना मैदानात उतरण्यास सांगितलं.
– देशातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक आशीर्वाद जनतेने दिला.
– अनेक राज्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली.
– काँग्रेसला मोठ्या पराभवाचे तोंड पहावे लागले
– अनेक ठिकाणी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.
– मोदींची लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम.
– जातीवाद परिवार वादाला नामोषेश करण्याचं हे जनादेश आहे.
– एक्झिट पोलनंतर अनेकांना ते पचले नाहीत. ईव्हीएमवर आरोप करत जनतेला फसवलं.
– अरूणाचलमध्येही पहिल्यांदा भाजपची बहुमताची सरकार बनली
– गोव्यातही विधानसभेत 4 पैकी 3 जागांवर विजय
– बंगालमध्येही अत्याचारांनंतरही 18 जागा भाजपला मिळाल्या. 5 विधानसभापैकी 4 विधानसभा भाजपाकडे आल्या. बंगालमध्येही येत्या काळात भाजप आपले वर्चस्व सिद्ध करेल.
– मोदींनी 5 वर्षांपर्यंत देशाचा गौरव वाढवण्याचे काम केले.
– वर्षांपासून जनतेला जे हवं होते ते यावेळी देण्याचा प्रयत्न केलाय.
– मोदी सरकारच्या धोरणांना जनतेने आशीर्वाद दिला.
– विरोधी पक्ष नकारात्मक अजेंडा घेऊन चालले त्यांना पराजय दाखवण्याचं काम भारतानं केलं.
– आज बंगालमध्ये दोन वर्षांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना भाजपाकडून श्रद्धांजली वाहतो.
– केरळ, कर्नाटकातील कार्यकर्त्यांनाही श्रद्धांजली देतो. आज सर्व कार्यकर्त्यांचा कामालाही सलाम करतो.
– मोदींच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने जनाधार वाढवला.
– कार्यक्षेत्राचा विस्तार केलाय. आता देशात सर्व राज्यांमध्ये भाजपाला विजय मिळेल.
– 75 वर्ष पूर्ण होतील तेव्हासाठी 75 संकल्प केलेत. जनताही आशीर्वाद देईल अशी अपेक्षा करतो. मोदींच्या नेतृत्वातच हे पूर्ण होईल.

First Published on May 23, 2019 8:56 pm

Web Title: the rise and rise of amit shah how a worker became most successful bjp president