News Flash

Priyanka Gandhi :राहुल गांधी हिंदुस्थानी आहेत हे वास्तव देशाला ठाऊक-प्रियंका गांधी

भाजपाचे लोक बकवास करत असल्याची प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी दिली आहे

Priyanka Gandhi

Priyanka Gandhi :राहुल गांधी हे हिंदुस्थानी आहेत हे सगळ्या देशाला ठाऊक आहे. राहुल याच देशात जन्माला आला इथेच लहानाचा मोठा झाला. असं असतानाही भाजपाचे नेते बकवास करत आहेत असं राहुल गांधी यांची बहिण आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली. नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून स्वामी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार केली.

याच तक्रारीबाबत प्रसारमाध्यमांनी जेव्हा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा भाजपाचे लोक बकवास करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. इतकंच नाही तर राहुल गांधी हिंदुस्थानीच आहेत. भारतात त्यांचा जन्म झाला, ते इथेच लहानाचे मोठे झाले हे सगळ्या देशानं पाहिलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी ‘ब्लॅक ऑप्स लि.’ या कंपनीच्या कागदपत्रांवर ब्रिटनचा नागरिक असल्याचे म्हटल्याचा आरोप आहे. भारतात दुहेरी नागरिकत्व बेकायदा असून या प्रकरणी केंद्राने राहुल यांचे नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे तक्रारही दाखल केली होती. मंगळवारी गृहमंत्रालयाने या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर राहुल गांधी काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र त्यांचे उत्तर येण्याआधीच प्रियंका गांधी यांनी भाजपाचे लोक बकवास करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 2:53 pm

Web Title: the whole of india knows that rahul gandhi is an indian says priyanka gandhi
Next Stories
1 मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर आत्महत्या करेन : वसीम रिझवी
2 दोन व्होटर आयडी असल्याने भाजपाची अरविंद केजरीवालांच्या पत्नीविरोधात तक्रार
3 राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस, राजनाथ सिंह म्हणतात…
Just Now!
X