21 September 2020

News Flash

Loksabha Election 2019 : प्रचारासाठी उमेदवार नव्हे पुतळाच

उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून लढवली अनोखी शक्कल

सगळीकडे तापमानाने चाळीशी पार केली आहे. त्यात निवडणुक प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक उमेदावर प्रचारात व्यस्त आहे. अशातच उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने प्रचारासाठी चक्क आपल्या पुतळ्याचा वापर केला आहे. ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी स्वत:चा पुतळा मैदानात उतरवला आहे.

अभिषेक वर्मा डायमंड हार्बर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदार संघात प्रचार करताना त्यांनी उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी पुतळ्याचा वापर केला आहे. एका जिप्सीमध्ये अभिषेक यांचा पुतळा आहे. ही जिप्सी प्रचार तरत डायमंड हार्बर या मतदार संघातून फिरत आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर अभिषेक यांच्या पुतळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका श्रृती झा नावाच्या युजर्सनी ही ममता बॅनर्जी यांची आयडिया असू शकते असे म्हटले आहे. तर अन्य एका नेटीझन्सनी या अनोख्या शैलीची स्तुती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 7:40 pm

Web Title: to apparently avoid campaigning in the sun tmc candidate uses statue instead of himself
Next Stories
1 चमत्कार! तब्बल २७ वर्षांनंतर महिला कोमातून बाहेर
2 अमेरिकी सरकारच बनवतयं मीम्स, कारण वाचून थक्क व्हाल
3 ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ पाहताना इतकी रडली की तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं
Just Now!
X