मिशीला पिळ देताना आपण काय बोलतो आहोत याचं भान ठेवावं, माथाडी कामगारांना पिळून टाकत तरूण वर्गात नैराश्य निर्माण केले जाते आहे हे नरेंद्र पाटील यांना लक्षात येत नाही का? असा प्रश्न विचारत उदयनराजेंनी नरेंद्र पाटील यांना उत्तर दिले आहे. काहीही झाले तरीही मी उदयनराजेंचा पराभव करणारच अशी गर्जना नरेंद्र पाटील यांनी केली होती. त्याच टीकेला उदयनराजेंनी उत्तर दिले आहे.

नरेंद्र पाटील यांनी आपण काय बोलतो याचे भान ठेवावे. आम्ही काय सुपरमॅन नाही. खरे बोलताना लक्षात ठेवावे लागत नाही मात्र खोटे बोलताना लाज वाटली पाहिजे असा चिमटा ही त्यांनी काढला. आम्ही आमच्या कार्यातू ओळख निर्माण केली आहे. नरेंद्र पाटील नावाचा बार फुसका आहे. भाजपा सरकारने आतापर्यंत अन्यायकारक निर्णय घेतले असून सर्वसामान्य जनता त्यात भरडली गेली. धोरण आखण्या ऐवजी शेतकऱ्यांचे तोरण बांधण्याचे काम भाजप सरकारने केले असा आरोप करीत देशाला महासत्तेकडे नेण्याची वेळ आल्याचंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

याच सभेत पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच सभेत भाजपावर निशाणा साधला. २३ मेनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. भाजपचे १६० च्या वर खासदार निवडून येणार नाहीत अशीही टीका चव्हाण यांनी केली. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही जातीयवादी पक्ष आहेत. मोदी हुकूमशाह असल्यासारखे वागत आहेत. मोदी हे हुकूमशाह झाले आहेत. सरकार बदलले की भाजपच्या नेत्यांचा लेखाजोखा बाहेर निघणार आहे.