24 September 2020

News Flash

मोदींच्या दौऱ्यापूर्वी १ लाख ४० हजार लिटर पाण्याने धुतले वाराणसीतील रस्ते

मोदींच्या दौऱ्यासाठी पाण्याची नासाडी

मोदी येण्याआधी धुतले रस्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीमध्ये मोठा रोड शो केला. आज पंतप्रधानांनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र पंतप्रधानांच्या या दोन दिवसीय दौऱ्याआधी बुधवारी रात्री वाराणसीमधील रस्ते धुवून काढण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या स्वच्छतेसाठी १ लाख ४० हजार लिटर पिण्याचे पाणी वापरण्यात आले. विशेष म्हणजे एकीकडे वाराणसी शहरातील ३० टक्के घरांमध्ये नळाने प्यायचे पाणी येत नसतानाच इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केवळ रस्ते धुण्यासाठी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत येण्याआधी शहरातील रस्ते धुवून काढण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले होते,’ अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भातील वृत्त द टेलीग्राफने दिली आहे. वाराणसी महापालिकेने मोदी शहरात येण्याच्या आदल्या रात्री पाण्याचे ४० टॅँक आणि ४०० कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील सर्व रस्ते चकाचक केले. अशाप्रकारे केवळ सणासुदीच्या दिवशी वाराणसीतले रस्ते वर्षातून एक दोन वेळा धुतले जातात.

वाराणसी हे येथील मंदिरांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असले तरी स्थानिक प्रशासनाच्या अहवालानुसार शहरातील ७० टक्के घरांमध्येच नळाने पाणी येते. आजही वाराणसीमधील ३० टक्के घरांना पिण्याच्या पाण्यासाठी वहीरींमधील पाण्यावर अवलंबून रहावे लागले.

फोटो साभार: द टेलीग्राफ

 

पिण्याच्या पाण्याचा मुद्दा मोदींनीही आपल्या भाषणामध्ये काढला. बुंदेलखंडमधील बांदा येथील सभेमध्ये मोदींनी, ‘तुम्ही पुन्हा एकदा मोदी सरकारला निवडूण द्या आणि मग पिण्याच्या पाण्याचे काम केले जाईल. पुढील पाच वर्षांमध्ये घरोघरी नळाने पाणी पुरवले जाईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने नदी, समुद्र आणि पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल,’ असे आश्वासन स्थानिकांना दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 2:30 pm

Web Title: varanasi uses 1 4 lakh litres of water to wash roads for modi
Next Stories
1 श्रीरंग बारणे की पार्थ पवार, मावळमधील तरुणांचे मत काय ?
2 मोदीच बहुमतानं जिंकावेत; मुस्लीम महिलांची माहिमच्या दर्ग्यात प्रार्थना
3 मोदींच्या नाही तर योगींच्या खुर्चीवर काँग्रेसचा डोळा – अखिलेश यादव
Just Now!
X