नागपूर : निवडणुकीच्या रणसंग्रामात अनेक उमेदवार रिंगणात आहेत, परंतु विकासासाठी झटणाऱ्यांनाच मतदान करा, असे आवाहन विदर्भातील लेखक, कलावंतांनी केले आहे.

भाजपप्रणीत सरकोरच्या विरोधात मतदान क रण्याचे आवाहन विदर्भातील कोही क लावंत व साहित्यिकोंनी केल्यानंतर त्याला छेद देणारी भूमिका काही लेखक, कलावंतांनी मांडली आहे. भाजप सरकारच्या काळात केंद्र व राज्य सरकारचे विदर्भाकडे पूर्ण लक्ष होते. या काळात विदर्भात अनेक प्रकल्प मार्गी लागले. याचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे

या विकास प्रक्रियेत त्यांचा मोठा  वाटा आहे. आधी विदर्भातील प्रकल्प पळवून नेले जायचे, परंतु भाजप सरकार आल्यावर असे प्रकार घडले नाहीत.   गडकरींच्या पुढाकाराने अनेक प्रकल्प आले. विदर्भातील लेखक, कलावंतांना गडकरींनी नेहमीच प्रोत्साहन दिले. येथे कधीच विद्वेषाचे वातावरण नव्हते, याकडेही  लक्ष वेधले आहे.

विकासासाठी मतदानाचे आवाहन करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि.स. जोग, डॉ. कुमार शास्त्री, चंद्रकांत चन्न्ो, आशुतोष शेवाळकर, राजेंद्र नाईकवाडे, शुभांगी भडभडे, आशुतोष अडोणी, श्याम देशपांडे, अमर कुळकर्णी, वर्षां किडे-कुळकर्णी, प्रकाश  एदलाबादकर, रेणुका देशकर, आनंद मास्टे, दीप्ती कुशवाह, नंदित साहू, स्वाती भालेराव, गजानन रानडे, नरेश गडेकर, संजय भाकरे यांच्यासह अनेक लेखक कलावंतांचा समावेश यामध्ये आहे.