“मी इंजिनिअर असून मला नट बोल्ड आवळता देखील येतात आणि ढिल्ले ही करता येतात. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बारामतीच्या या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार” या शब्दात शिवसेनेचे नेते मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना टोला लगावला. विधान सभेला विजय शिवतारे कसा निवडून येतो असे विधान अजित पवार यांनी एका भाषणात केले होते. त्यावर शिवतारे यांनी त्यांच्या खास शैलीत प्रतिउत्तर दिले.
शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सभेला उपस्थित होते. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे बोलत होते. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक नाना भानगिरे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
First Published on April 23, 2019 10:56 pm