News Flash

मला मतदान करा नाहीतर.. मनेका गांधींचा मुस्लिमांना इशारा

मी जिंकणार हे नक्की आहे पण मला मुस्लिम मतं मिळाली नाहीत तर मलाही त्यांचा विचार करता येणार नाही

.

मला मतदान करा अन्यथा, जेव्हा नोकरी मागण्यासाठी माझ्याकडे याल तेव्हा मी तुमचा विचार करणार नाही असे मनेका गांधी यांनी सुलतानपूर येथील मुस्लिमांना सुनावले आहे. मी जिंकून येणार याची मला खात्री आहे, तुम्ही मत द्या किंवा देऊ नका मात्र मत दिलं नाहीत तर जेव्हा तुम्हाला माझी गरज लागेल तेव्हा मलाही विचार करावा लागेल असं म्हणत मनेका गांधी यांनी सुलतानपूर येथील मुस्लिमांना इशारा दिला आहे.

मी जिंकणार हे नक्की आहे, लोकांची मला मदत होते आहे. मात्र माझा विजय मुस्लिम मतांशिवाय झाला तर मला फार काही चांगलं वाटणार नाही. मी कुठेतरी खट्टू होईन. जेव्हा मुस्लिम बांधव माझ्या दारात मदत मागायला येतील तेव्हा मलाही त्यांचा विचार करावा लागेल आणि माझ्या मनात ही गोष्ट येईलच की त्यांनी मला मत दिले नाही. आम्ही काय गांधीजींची ती लेकरं नाही जी फक्त फक्त वाटत बसू..आणि मतदानात मार खात राहू.. फक्त नोकरीचच नाही कोणतंही काम असलं तरीही तिथे व्यवहार हा आलाच.

तुम्ही मला मत दिलं नाही तर मलाही तुमचा विचार करता येणार नाही असा इशाराच मनेका गांधी यांनी दिला. आम्ही सगळं वाटून टाकायचं आणि तुम्ही आम्हाला मतदानात मार खाणार हे काही मला रुचणार नाही. मी जर तुमच्यापुढे मैत्रीसाठी हात पुढे केला आहे तर तुम्ही स्वीकाराली पाहिजे असेही मनेका गांधी यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर हा इशारा मी फक्त मुस्लिम बांधवांनाच नाही तर साक्षी महाराज आणि इतर सगळ्यांनाही देते आहे असेही मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 4:33 pm

Web Title: vote for me or else maneka gandhi warns sultanpur muslims
Next Stories
1 नांदेड : काँग्रेसला भाजपाचं तगडं आव्हान, ग्रामीण मतदारांची भुमिका ठरणार निर्णायक
2 शहीद जवानांच्या नावावर मत मागताना लाज कशी वाटत नाही – मुंडे
3 मतदारांनो गाफील राहू नका, अजित पवार यांचे आवाहन
Just Now!
X