News Flash

मागच्या पाच वर्षात १५०० कायदे रद्द केले – पंतप्रधान मोदी

व्यापारी नेहमी देशाचा विचार करतात. एकवेळ आपल्या देशातल्या व्यापाऱ्यांची शक्ती होती की, ज्यामुळे आपल्या देशाला 'सोने की चिडिया' म्हटले जायचे.

व्यापारी नेहमी देशाचा विचार करतात. एकवेळ आपल्या देशातल्या व्यापाऱ्यांची शक्ती होती की, ज्यामुळे आपल्या देशाला ‘सोने की चिडिया’ म्हटले जायचे. व्यावसायिक क्षेत्रातील लोक हे हवामान शास्त्रज्ञांसारखे असतात. कारण त्यांना आधीच सर्व माहिती असते. कुठल्या वस्तूची किती प्रमाणात गरज आहे याचा अंदाज ते आधीच वर्तवतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते दिल्लीत व्यापारी परिषदेत बोलत होते.

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मी आश्वासन दिले होते की, मी सत्तेत आलो तर दररोज एक कायदा रद्द करीन. तुम्हाला ऐकून आनंद वाटेल मागच्या पाच वर्षात १५०० कायदे आमच्या सरकारने रद्द केले असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने नेहमीच व्यापाऱ्यांना दोष दिला आहे. किंमती वाढतात तेव्हा व्यापाऱ्यांना त्याचा सर्वात जास्त फटका बसतो असे मोदी म्हणाले.

आधी सरकारी यंत्रणांच्या हस्तक्षेपामुळे युवा वर्ग व्यवसायापासून दूर रहायचा. आता डिजिटल व्यवस्थेचा प्रचार, नियमांमध्ये झालेला बदल आणि जीएसटीमुळे युवा वर्गासमोरील व्यवसाय सुरु करण्याच्या अडचणी कमी झाल्या आहेत. आता तुम्हाला एका तासाच्या आत व्यवसाय सुरु करण्यासाठी एक कोटीपर्यंत कर्ज लगेच मिळते असे मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 7:01 pm

Web Title: we abolished 1500 laws in 5 years narendra modi
Next Stories
1 पुण्यातील सभेत राज ठाकरे रमेश वांजळेंच्या आठवणीने गहिवरले, म्हणाले…
2 करकरे शहीदच ते साध्वींच व्यक्तीगत मत; भाजपाने वर केले हात
3 “प्रज्ञासिंहचा मुख्यमंत्र्यांनी निषेधही केला नाही, त्यांना अजून लाज कशी वाटत नाही?”
Just Now!
X