News Flash

२ मे रोजी राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर…; मोदींनी बंगाली जनतेला दिला शब्द

पुरुलिया येथील भाजपाच्या प्रचारसभेत मोदींनी दिला शब्द

फोटो सौजन्य : ट्विटरवरुन

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरुलिया येथे प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मोदींनी तृणमूल काँग्रेस तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल करतानाच राज्यामध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर अत्याचार करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल असा शब्द बंगालच्या जनतेला दिला. भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा कायद्याचं राज्य येईल असंही मोदींनी म्हटलं आहे.

ममता दीदींनी पश्चिम बंगालची वाईट अवस्था करुन ठेवल्याचा आरोपही मोदींनी केला. गुन्हे आहेत, गुन्हेगार आहेत मात्र ते तुरुंगात जात नाहीत. माफिया आहेत, घुसखोरी करणारे आहेत मात्र ते मोकाट फिरत आहेत. सिंडिकेट आहेत, घोटाळे आहेत मात्र त्यांच्यावर ममतांच्या राज्यात कोणतीच कारवाई केली जात नाही, असं मोदी म्हणाले. राज्यातील गुन्हेगारीसंदर्भात भाष्य करताना मोदींनी रात्री २४ उत्तर परगना येथे झालेल्या हल्ल्यांचा संदर्भ दिला. काल रात्री २४ उत्तर परगनामध्ये एका डझनहून अधिक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. भाजपाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आलं. हे सर्व योग्य नाहीय. हा सूट उगवण्याचा प्रकार, अथ्याचार आणि माफियाराज यापुढे चालणार नाही, असा इशारा मोदींनी दिलाय.

आपण सर्वांनी मिळून गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या स्वप्नातील सोनार बंगला पुन्हा घडवण्याची गरज आहे, असं भावनिक आवाहनही मोदींनी केलं. असा सोनार बंगला आपल्याला घडवायचा आहे की जिथे समानता असेल आणि आत्मनिर्भर्तेचं समर्थ्यही असेल. ज्या सोनार बंगलामध्ये उद्योगांची कमतरता नसेल असं राज्य घडावायंच आहे. ज्या राज्यात हिस्सा घेणे, कटमनी, सिंडेकटसारखा भ्रष्टाचार नसेल असा सोनार बंगला आपल्याला घडवायचा आहे. आपल्या सोनार बंगलामध्ये गुन्हेगारांची जागा तुरुंगात असेल रस्त्यावर नाही, असंही मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी अम्फान वादळ आलं तेव्हा ममता दीदींनी काहींच केलं नाही असा आरोपही केला आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्व क्षेत्रांचा विकास एकत्र झाला तरच सर्वसमावेशक विकास शक्य असल्याचं मोदींनी या भाषणामध्ये म्हटलं आहे. मात्र ममता या दलित, आदिवासी, एससी आणि एसटी वर्गातील लोकांसोबत कधीच उभ्या राहिल्या नाहीतर. दहा वर्ष त्यांनी भ्रष्टाचार करुन या लोकांचं नुकसान केलं, असा आरोप मोदींनी केला.

सभेतील गर्दी पाहून मोदींनी, तुमचा हा उत्साह पाहून प्रत्येक सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे. प्रत्येक नफेखोरी करणाऱ्याची झोप उडाली आहे, असं म्हटलं. पुढे बोलताना, ममता दीदींना तर जनधन खात्यांची भीती वाटतेय. बंगालमध्ये कोट्यावधी जनधन खाती सुरु झालीय. तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याची जबाबदारी मी घेतो. तुमची गर्जना पाहून ममता दीदी जाण्याचा काउटडाऊन सुरु झाला आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2021 2:08 pm

Web Title: we will have crime free west bengal pm narendra modi in purulia rally scsg 91
Next Stories
1 पश्चिम बंगाल : टीएमसी व काँग्रेसच्या टीकेनंतर स्वपन दासगुप्ता यांचा राज्यसभेतून राजीनामा
2 “तुम्हाला पायचं दुखणं जाणवतं पण हत्या झालेल्या १३० भाजपा कार्यकर्त्यांच्या…”; शाह यांची ममतांच्या दुखापतीवरुन टीका
3 “मोदी सरकारच्या योजना राज्यातील जनतेपर्यंत न पोहचू देण्यात ममता सरकार सर्वात मोठा अडथळा”
Just Now!
X