News Flash

राष्ट्रवादीला आम्ही नॅनो पार्टी बनविणार : मुख्यमंत्री

राहुल गांधींचे पणजोबा, आजी, वडील आले पण गरिबी हटवली नाही, आता काय खाऊन ते गरिबी हटवणार? अशा शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली.

या निवडणुकीत माढ्यातून शरद पवार निवडणुकीच्या तयारीत होते. मात्र, त्यांना नेहमीप्रमाणे वार्‍याचा अंदाज आला आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेत बाराव्या खेळाडूची भूमिका पार पाडणे पसंत केले. आता या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला नॅनो पार्टी बनविणार आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादीला आता भाड्याने वक्ते आणावे लागत असून बस, सायकल भाड्याने घेतात. पण पवार साहेबांनी इंजिन भाड्याने घेतले आहे. तेही बंद पडलेले घेतले असून ते ना विधानसभेत चालेल, ना पालिका निवडणुकीत. कितीही वेळा म्हणालात ‘लाव रे तो व्हिडीओ, लाव रे व्हिडीओ’ पण जर २०१४ सालचा त्यांचा तो व्हिडीओ लावला तर काय अवस्था होईल? हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दात राज ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. राहुल गांधींचे पणजोबा, आजी, वडील आले पण गरिबी हटवली नाही. आता काय खाऊन ते गरिबी हटवणार? अशा शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली.

खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाचे पदाधिकारी राहुल शेवाळे यांना घरात घुसून ठोकून काढण्याची धमकी देणारा ऑडिओ मध्यंतरी राज्यभर एक चर्चा विषय ठरला होता. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेत म्हणाले, सुप्रिया सुळे यांनीही मोदी यांचा गुण घेतला आहे. त्यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानला घुसून मारणार अस सांगितलं त्याप्रमाणे त्या घरात घुसून मारण्याची भाषा करत असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांना त्यांनी लक्ष केले.

शिवतारेंच्या विधानावर मुख्यमंत्र्यांनी लावला डोक्‍याला हात

देशाचा पंतप्रधान पुढील काळात कोण होईल, ते म्हणजे महाराष्ट्रातील हे नेते असतील असे शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत बोट केले. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी चेहर्‍यावर स्मितहास्य दाखवत डोक्याला हात लावला. यावेळी सभा ठिकाणी असलेल्या नागरिकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजून शिवतारे यांच्या विधानाला साथ दिली.

मुख्यमंत्र्यांसमोर शिवसंग्रामच्या अध्यक्षाची खंत

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीच्या प्रचाराबाबत बैठका, रॅलींविषयी महायुतीतील नेते मंडळी कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. तसेच सभेच्या ठिकाणी असलेल्या फ्लेक्सवर शिवसंग्राम पक्षाचे नेते अध्यक्ष विनायक मेटे यांचा फोटो देखील लावला गेला नाही. अशी खंत शहर अध्यक्ष तुषार काकडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली. तर पक्षाच्या आदेशानुसार आम्ही काही झाले तरी आम्ही प्रचारात सक्रिय सहभागी होऊन काम करीत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 10:40 pm

Web Title: we will make ncp nano party says cm fadnvis
Next Stories
1 आयसिस मॉड्युल : एनआयएचे हैदराबाद, वर्ध्यात छापे; चार संशयीत ताब्यात
2 विंग कमांडर अभिनंदन यांची ‘वीरचक्र’साठी शिफारस; सुरक्षेसाठी काश्मीरमधून बदली
3 शिवसेना-अढळराव सेनेची भुमिका भिन्न; पन्हाळगड प्रकरणावर अमोल कोल्हेंचे उत्तर
Just Now!
X