26 February 2020

News Flash

नरेंद्र मोदींना मतं द्यायची ती कोणत्या निकषांवर?- राज ठाकरे

जातीचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या तोंडावर का करत आहेत? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतं मागत आहेत, शहिदांच्या नावावर मतं मागत आहेत. मात्र या भाजपा-सेनेच्या सरकारला कोणत्या निकषांवर मतं द्यायची? यांनी दिलेली सगळी फोल ठरली. सगळे निर्णय फसले. एकट्या महाराष्ट्रात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यांच्या काळात २०१६ पर्यंत ३८ हजार बलात्कार झाल्याची नोंद आहे. त्यानंतर या नोंदीच बंद करण्यात आल्या. मीडियाची मुस्कटदाबी करण्याची सुरूवात मोदींनी केली. आता कोणत्याही बातम्या ते बाहेर येऊ देत नाहीत अशीही टीका राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेत केली.

एचएल या कंपनीची क्षमता असतानाही फक्त मैत्री जपण्यासाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलसंदर्भातलं कंत्राट देण्यात आलं असाही आरोप राज ठाकरेंनी केला. तसंच एचएएल आणि जेट या कंपन्या डबघाईला आणण्याचं काम या सरकारने केलं. याच सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव देऊ असं आश्वासन दिलं होतं, बेरोजगारी हटवण्यात येईल. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, काळा पैसा भारतात आणू, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू ही आणि अशी अनेक स्वप्नं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवली होती. मात्र यातलं एकही स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं नाही. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांपूर्वी काय आश्वासनं दिली होती? आणि अमित शाह म्हटले होते की पंधरा लाख रूपये हा जुमला आहे ती क्लिपही या भाषणात राज ठाकरेंनी दाखवली. देशाला मूर्ख बनवण्याचं काम अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गांधी परिवारातल्या सदस्यांनी भ्रष्टाचार केला. रॉबर्ट वढेराला तुरूंगात टाकण्याची भाषा भाजपाच्या नेत्यांनी २०१४ च्या आधी केली होती. आता मात्र या कोणत्याही गोष्टींचा उल्लेखही मोदी करत नाहीत. रॉबर्ट वढेरा यांच्या अटकेबाबत अमित शाह यांनी काय म्हटलं होतं त्याचीही क्लिप राज ठाकरेंनी दाखवली आणि देशाला हे लोक कसे मूर्ख बनवतात ते पहा असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं.

काँग्रेसच्या काळात टू जी घोटाळा प्रकरणी ए राजा, कनिमोळी यांच्यासह अनेकांना तुरुंगात धाडलं होतं. ते सगळे भाजपाच्या काळात कसे सुटले ? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावर टीका होते असे वक्तव्य नरेंद्र मोदींनी केली होती. तुम्ही हे काय बोलत आहात? प्रश्न विचारल्यावर तुम्हाला जात आठवते का? असेही प्रश्न राज ठाकरेंनी विचारले. सगळी खोटी आश्वासनं देणाऱ्या आणि खोटं बोलणाऱ्या मोदींना कोणत्या निकषांवर मतं द्यायची? असा प्रश्न राज ठाकरेंनी पुन्हा एकदा विचारला.

First Published on April 26, 2019 9:21 pm

Web Title: what modi did for country asks raj thackeray in nashik speech
Next Stories
1 सिंचन घोटाळा झाला की नाही?, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
2 नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात काय केलं?-राज ठाकरे
3 काँग्रेसला जास्तीत जास्त ५० जागा मिळतील – नरेंद्र मोदी
Just Now!
X