आम्ही आमच्या अर्थसंकल्पातून प्रामाणिक करदात्यांचे आभार मानले. काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी मध्यमवर्गाची साधी कधी दखलही घेतली नाही. मध्यमवर्गीय प्रामाणिक करदाते ही देशाची संपत्ती आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील सभेत म्हणाले. काँग्रेसच्या नेत्याने देशातल्या मध्यवर्गाला स्वार्थी म्हटले. काँग्रेसने जाहीरनाम्यात मध्यमवर्गाबद्दल काहीही म्हटलेले नाही. एका कुटुंबांच्या भल्यासाठी मध्यमवर्गावर काँग्रेसला टॅक्स लादायचा आहे असा आरोप त्यांनी केला.

गेल्या पाचवर्षात भ्रष्टाचाराच्या बातम्या गायब झाल्या. कारण भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावले उचलली. पाच वर्षात कर वाढवला नाही तर करदात्यांची संख्या वाढवली. पाच लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त केले असे मोदी म्हणाले. २०१४ च्या निवडणुकीत महागाई मुद्दा होता. आता विरोधकही हा विषय काढत नाही.

वेगवान विकास आणि महागाईमध्ये वाढ नाही हे गेल्या तीन दशकात पहिल्यांदा घडलं आहे. लाल किल्ल्यावरुन केलेल्या एक आवाहनावर अनेकांनी गॅसची सबसिडी सोडली. त्यांनी अनुदान सोडल्यामुळे गरीबांच्या घरात गॅस सिलिंडर आले असे मोदी म्हणाले.