मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कोकणातील महाडमध्ये सभा झाली. यावेळी कोकणामध्ये खूप क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. केरळ हे संपूर्ण राज्य पर्यटनावर चालते. कोकणात केरळपेक्षा पुढे जाण्याची क्षमता आहे. परदेशाच्या धर्तीवर कोकणाचा विकास झाला तर तीन जिल्हे अख्खा महाराष्ट्र जगवू शकतात असा दावा राज ठाकरेंनी केला.
कोकणाची क्षमता लक्षात घेतली तर कोकण आज कुठच्या कुठे असायला पाहिजे होता. पण आमदार, लोकप्रतिनिधींनी कोकणाच्या विकासासाठी काय केले? आमदार परदेश दौरे करुन आले पण कोकणात काय बदल झाला ? असा सवाल त्यांनी केला.
रस्ते होणं म्हणजे विकास नाही. अॅमेझॉनच्या खोऱ्यानंतर कोकणात सहयाद्रीच्या खोऱ्यामध्ये जैवविविधता दडलेली आहे. पण नेते स्वत:च आयुष्य आणि परिवारामध्ये गुरफटलेले आहेत. त्यामुळे अजूनही कोकणाचा विकास झालेला नाही असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 19, 2019 9:32 pm