15 October 2019

News Flash

पुढील पंतप्रधान कोण होणार? अंदाज वर्तवा आणि झोमॅटोवर मिळवा कॅशबॅक-सूट!

तुम्ही पुढचा पंतप्रधान कोण होईल? याचा अंदाज वर्तवणार असाल तर तुमच्यासाठी झोमॅटोनं दोन ऑफर्स आणल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता संपला असून फक्त २३ मे रोजीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यानंतर देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल हे देखील स्पष्ट होईल. मात्र, तत्पूर्वी जर तुम्ही पुढचा पंतप्रधान कोण होईल? याचा अंदाज वर्तवणार असाल तर तुमच्यासाठी झोमॅटोनं दोन ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये तुम्हाला सूट आणि कॅशबॅक मिळणार आहे.

‘झोमॅटो इलेक्शन लीग’ नावाने झोमॅटोने आपल्या ग्राहकांसाठी या ऑफर्स दिल्या आहेत. यामध्ये तुम्ही पुढील पंतप्रधान कोण असेल? याचा अंदाज वर्तवल्यास ५०० रुपयांपर्यंतच्या ऑर्डरवर तुम्ही ३० टक्के कॅशबॅक जिंकू शकता. त्यासाठी झोमॅटो अॅपवर जाऊन तुम्ही पुढील पंतप्रधान कोण असेल याचे भाकित केले आणि प्रत्यक्षात त्याच व्यक्तीची पुढील पंतप्रधान म्हणून निवड झाली तर तुम्हाला ३० टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

तसेच जरी तुमचा अंदाज चुकला तरी सध्या तत्काळ प्रोमो कोड वापरुन ऑर्डरवर हमखास ४० टक्के सूट तुम्हाला मिळवता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला झोमॅटोच्या अॅपमध्ये जाऊन झोमॅटो इलेक्शन लीगमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे.

First Published on May 19, 2019 10:08 pm

Web Title: who will be the next pm guess it and get the cashback and discount on zomato