देशातील नक्षलवाद्यांचा २०२३ पर्यंत समूळ नायनाट केला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

सुरक्षा हा देशाच्या विकासामधील आवश्यक भाग आहे आणि त्याच्या मार्गात येणारे बंडखोर आणि दहशतवादी यांना चिरडून टाकण्यात येईल, असे राजनाथ सिंह यांनी येथे एका निवडणूक सभेत सांगितले.

झारखंडमधील नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे, राज्यात काही ठिकाणी असलेले त्यांचे अस्तित्व लवकरच संपुष्टात आणले जाईल, असेही गृहमंत्री म्हणाले. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने सत्तेसाठी हातमिळवणी केली आहे, मात्र त्यांचे उद्दिष्ट सफल होणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेचा एकही नेता विरोधी पक्षांकडे नाही. जे नेते म्हणून समोर येत आहेत ते मोदी यांच्यापुढे खुजे आहेत, असेही राजनाथ सिंह म्हणाले.