News Flash

‘खरे देशद्रोही कोण?’; शहीद करकरेंवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांचा सवाल

'पंतप्रधान मोदी आणि शाह साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे समर्थन करणार का?'

विरोधकांचा सवाल

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन विरोधकांनी भाजपाला चांगलेच धारेवर धरले आहे. ‘आता खरे देशद्रोही कोण?’ असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे. यावरूनच आता विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठवली आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करताना शहीद झालेल्या करकरेंबद्दल असे वक्तव्य करणाऱ्या साध्वी यांचा निषेध केला आहे. ट्विटवरुन अनेक पक्षांनी या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

खरे देशद्रोही कोण?, आम आदमी पक्षाचा सवाल

या देशद्रोही सरकारला धडा शिकवा: सीपीआय (एम)

भाजपाच्या दृष्टीने हा देशद्रोह: मेहबुबा मुफ्ती

मोदी शाह समर्थन करणार का?: माजिद मेनन

शहीदांचा अपमान कसा करु शकतात: औवेसी

खरे देशद्रोही कोण?

नक्की वाचा >> दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारुन माझं सुतक संपवलं: साध्वी प्रज्ञासिंह

काय म्हणाल्या साध्वी

साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी भाष्य केले.साध्वी प्रज्ञासिंह या भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार असून त्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.

नक्की वाचा >> साध्वींच्या विधानावर भाजपा प्रवक्ते म्हणतात…

त्या पुढे म्हणाल्या, हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. यावर मी म्हटलं की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले. रावणाचा अंत प्रभू रामाने संन्याशांच्या मदतीने केला होता. २००८ मध्येही हेच झाले. निरपराध संन्याशांना तुरुंगात डांबण्यात आले. यावर मी सर्वनाश होईल असा श्राप दिला होता आणि त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहित आहे, असे साध्वींनी म्हटले आहे.

साध्वी यांच्या या वक्तव्यावरुन भाजपावर होणारी टिका पाहता भाजपाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 2:13 pm

Web Title: whos the real anti national now asks opposition after sadhvi pragyas controversial comment about hemant karkare
Next Stories
1 अंमळनेरमध्ये धरणग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
2 प्रियांका चतुर्वेदींची काँग्रेसला सोडचिठ्ठी; शिवसेनेत केला प्रवेश
3 साध्वींच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी: जितेंद्र आव्हाड
Just Now!
X