15 November 2019

News Flash

काँग्रेस उमेदवाराचा प्रचार पडला महागात, ACP नरसिंग यादव यादव निलंबीत

नरसिंग यादवने केला संजय निरुपमांचा प्रचार

कुस्तीपटू आणि मुंबई पोलिसांमध्ये ACP पदावर कार्यरत असलेल्या नरसिंग यादव याच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. नरसिंग यादवने काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता.

मात्र सरकारी सेवेत असणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला निवडणूक प्रचारात सहभागी होता येत नाही. यासाठी नरसिंग यादववर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबईच्या आंबोली पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नरसिंग यादव सध्या मुंबई पोलिसांच्या शस्त्रागार विभागात कार्यरत आहे. मंगळवारी राज्यभरात १४ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. त्यामुळे नरसिंग यादवच्या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First Published on April 24, 2019 4:48 pm

Web Title: wrestler turned acp narsingh suspended for campaigning for congress