उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशात आता शिवसेनाही लढाईत उतरली आहे. डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत हे उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. तिथल्या एका प्रचारसभेत आदित्य ठाकरेंनी आक्रमक होत भाजपावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी करोनाच्या पहिल्या लाटेतली एक आठवणही सांगितली आहे.

करोना महामारीच्या काळात पहिल्या लाटेदरम्यान मजुरांच्या आपापल्या राज्यात परतण्याच्या तिकीटाचे पैसेही मुख्यमंत्री रिलीफ फंडातून दिल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. डुमरियागंज इथल्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, जनता कर्फ्यु लावण्यात आल्यावर उत्तर प्रदेश, बिहारचे जे नागरिक मुंबईत राहत होते, त्यांना आपल्या गावी, आपल्या आईवडिलांकडे, परिवाराकडे परतायचं होतं. रेल्वे स्थानकांवर गर्दी जमली होती, रेल्वे कधी सुटणार याची ते वाट बघत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा केंद्र सरकारला सातत्याने फोन करत होते की उत्तर प्रदेश, बिहारच्या बांधवांना आपल्या घरी जायचं आहे, त्यामुळे रेल्वे सोडा. मात्र तरीही भारत सरकारने १ मे पर्यंत रेल्वे बंद ठेवल्या. हे किती लाजीरवाणं आहे?

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
water Buldhana district, water shortage Buldhana
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “सगळे लोक हे चालत जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वांना भावनिक आवाहन केलं, आम्ही काळजी घेतो असं सांगून त्यांना परत न जाण्याचं आवाहन केलं. जेवण, राहणं, आरोग्यसुविधा या सगळ्याची जबाबदारी आम्ही पार पाडली. यातूनही जेव्हा रेल्वे सोडण्यात आल्या तेव्हा लाजिरवाणी गोष्ट अशी की रेल्वेने तिकीटाचेही पैसे मागितले. तेव्हा हे तिकीटाचे पैसे मुख्यमंत्री रिलीफ फंडातून देण्यात आले. हे निवडणुकीसाठी नव्हतं. हे एक प्रेमाचं, बंधुत्वाचं नातं होतं”.

उत्तर प्रदेशात शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. हे मतदान सात टप्प्यांमध्ये पार पडणार असून ७ मार्च रोजी अखेरच्या टप्प्यातलं मतदान होणार आहे.