उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर केला जातो आहे. अशातच पंतप्रधान मोदींनी आता आणखी एक नवीन घोषणा दिली आहे. ‘एक हैं तो सेफ हैं’, असं ते म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या दोन्ही घोषणांची सध्या चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान मोदी हे शुक्रवारी धुळे आणि नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. या सभांमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्र सोडलं. अनुसूचित जाती आणि जमातीतील एकजूटता तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. ही एकजूटता काँग्रेसला सहन होत नाही. देशभरातील आदिवासी जातींना एकमेकांविरोधात लढवणे हाच काँग्रेसचा मुख्य अजेंडा आहे, असे ते म्हणाले.

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
amit shah slams uddhav thackeray in karad public meeting
बाळासाहेबांनी कमावलेले सर्व उद्धव ठाकरेंनी गमावले; अमित शहा यांचा हल्लाबोल
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”

‘एक हैं तो सेफ है’ पंतप्रधान मोदींची घोषणा

काँग्रेस अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरोधात उभं करण्याच्या प्रयत्नात आहे. आदिवासी जर एकत्र आले, तर त्यांची ताकद वाढेल आणि वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेले, तर त्यांची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणतो की ‘एक हैं तो सेफ है’. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा हा डाव हाणून पाडायचा आहे. आपल्याला विकासाच्या वाटेवर पुढे जायचं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Supriya Sule : “…तर तुम्हाला कोर्टात खेचेन, सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस”, सुप्रिया सुळेंचा दावा

योगी आदित्यनाथ यांनी दिली होती घोषणा

तत्पूर्वी योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणूक तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. या निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या प्रचारादरम्यान ही घोषणा दिसून येत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी मु्ंबईत या घोषणेचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर वाशिम आणि अमरावतीत झालेल्या सभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा या घोषणेचा पुनउच्चार केला. आता अनेक भाजपाचे नेते त्यांच्या भाषणात ही घोषणा देताना दिसून येत आहेत.

Story img Loader