05 March 2021

News Flash

Ahmadnagar सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

डॉ. सुजय विखे यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे पारनेर तालुक्यातील काँग्रेस पक्ष संपुष्टात आला आहे. तालुक्यातील काँग्रेस पक्षात विखे परिवार आणि माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत डॉ. विखे पर्यायाने भारतीय जनता पक्षाबरोबर राहणार हे स्पष्ट आहे. काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य व पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्करराव शिरोळे, बाजार समितीचे सभापती विलास झावरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी डॉ. विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी उपस्थित होते. ही बाब लोकसभा निवडणुकीत तालुक्यात काँग्रेसची नेमकी काय परिस्थीती असेल हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. माजी आमदार झावरे यांचे चिरंजीव राहुल झावरे काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य असले, तरी शिवसेनेच्या पाठिंब्यावर ते पंचायत समितीचे सभापती आहेत आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचा धर्म पाळला नाही तरी त्यांच्या पदाला धोका नाही. काँग्रेसचे निघोज गणातील पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर हे देखील कट्टर विखे समर्थक आहेत. वेळ पडल्यास पंचायत समिती सदस्यत्वावर ते पाणी सोडतील पण विखेंची साथ सोडणार नाहीत. एकूणच तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विखेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट आहे. डॉ. विखे यांच्या भाजपा प्रवेशाच्या वेळी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य (कै.) अण्णा पाटील शिंदे यांचे चिरंजीव व दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. बबनराव सोबले यांचे चिरंजीव डॉ. विनायक सोबले, तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र औटी आदी उपस्थित होते. कोपरगावची राजकीय समीकरणे बदलणार डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याने आगामी काळात कोपरगावच्या राजकारणातही राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विखे यांनी जिल्हाभरात तालुका विकास आघाडय़ा निर्माण करून ठेवलेल्या असल्याने त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा संग्रह आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत या आघाडय़ांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात मोठी डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. कर्जतला भाजपमध्ये सावधगिरी, काँग्रेसमध्ये नैराश्य कर्जत जामखेड मतदारसंघात नवीन समीकरणे निर्माण होणार आहे. विखे यांच्या भाजप प्रवेशाने त्यांचे समर्थक आनंदी झाले आहेत. सुजय विखे हे मागील दोन वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर जाऊन स्वत:चा गट निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत स्वत:चे नाव आणि सामाजिक कार्य पोहोचवले आहे याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिलांची मोठी चळवळ केली आहे यामुळे या सर्व बाबींचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भविष्य काळामध्ये होईल. त्यांच्या व्यासपीठावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुसंख्य नेते दिसून येत असत मात्र आता जरी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असला तरीही यातील बहुसंख्य मंडळी वैयक्तिक जोडले गेल्यामुळे त्यांच्या सोबत राहतील.

ahmadnagar Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Sujay Radhakrishna Vikhe
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Ahmadnagar सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Gandhi Dilipkumar Mansukhlal
BJP
39.65%
2014
Gandhi Dilipkumar Mansukhlal
BJP
56.97%
2019
Dr. Sujay Radhakrishna Vikhepatil
BJP
58.54%

Ahmadnagar मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
SHEVGAONMonika Rajiv RajaleBJP
RAHURIKardile Shivaji BhanudasBJP
PARNERAuti Vijayrao BhaskarraoSHS
AHMEDNAGAR CITYSangram Arunkaka JagtapNCP
SHRIGONDAJagtap Rahul KundlikraoNCP
KARJAT JAMKHEDPro. Ram Shankar ShindeBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X