Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमाने फिरणार अशी पोस्ट करत २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम २९ दिवस उरले आहेत. महायुतीमधल्या भाजपाने ९९ जागा जाहीर केल्या आहेत. तर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारक?

१) अजित पवार<br>२) प्रफुल पटेल
३) सुनील तटकरे
४) छगन भुजबळ
५) दिलीप वळसे पाटील
६) धनंजय मुंडे
७) हसन मुश्रीफ
८) नरहरी झिरवाळ
९) आदिती तटकरे
१०) नितीन पाटील
११) सयाजी शिंदे
१२ ) अमोल मिटकरी<br>१३) जल्लाउद्दीन सैय्यद
१४) धीरज शर्मा
१५) रुपाली चाकणकर
१६) इद्रिस नायकवडी
१७) सूरज चव्हाण
१८) कल्याण आखाडे
१९) सुनील मगरे
२०) महेश शिंदे
२१) राजलक्ष्मी भोसले
२२) सुरेखा ठाकरे
२३) उदयकुमार आहेर
२४) शशिकांत तरंगे
२५) वासिम बुऱ्हाण
२६) प्रशांत कदम
२७) संध्या सोनवणे

अजित पवारांची गुलाबी थीम

अशी या स्टार प्रचारकांची नावं आहेत. अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी गुलाबी जॅकेट आणि गुलाबी गाड्या अशी प्रचाराची थीम घेतली आहे. साधारण मागच्या काही महिन्यांपासून त्यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही असंही अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. तसंच महायुतीचं सरकार येणार हा विश्वासही व्यक्त केला आहे. विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात येत आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी जी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे ते प्रचारक राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसतील.

हे पण वाचा अजित पवार गटाकडून आमदारांना संधी, चार जणांना एबी अर्ज, तिघे बाकी

महाराष्ट्रातली निवडणूक २० नोव्हेंबरला, निकाल २३ नोव्हेंबरला

महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे. एकाच टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. तसंच २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना या निवडणुकीत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर दुसरीकडे हरियाणा या ठिकाणी मिळालेल्या विजयामुळे भाजपानेही महाराष्ट्रात याच विजयाची पुनरावृत्ती होईल असं म्हटलं आहे. आता काय होणार ते २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहेच. मात्र अजित पवारांनी खास पोस्ट करत स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

Story img Loader