05 March 2021

News Flash

Akola सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

अकोला लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती व सामाजिक समीकरण बघता भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अकोला मतदारसंघाची ओळख होती. मात्र गेल्या तीन दशकांत काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढणे भाजपच्या पथ्यावर पडत गेले. १९९८-९९ व १९९९-२००४ मध्ये भारिप-बमसंचे अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा गाठली. या दोन निवडणुकांचा अपवाद सोडल्यास प्रत्येकी तीन वेळा भाऊसाहेब फुंडकर आणि खासदार संजय धोत्रे विजयी झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी काँग्रेसच्या हिदायत पटेल यांचा २,०३,११६ मतांनी पराभव केला होता. अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला. दोनदा त्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यंदा काँग्रेस आघाडीबरोबर यावे म्हणून काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने एमआयएमशी आघाडी केली आहे. यामुळे दलित व मुस्लीम मतांची मोट बांधली जाते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भीमा-कोरेगावनंतर राज्यात दलित समाजात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा आंबेडकर यांनी प्रयत्न केला. गेल्या वेळी अकोल्यातच तिसऱ्या क्रमांकावर त्यांची पीछेहाट झाली होती. यामुळे यंदा प्रकाश आंबेडकर कोणती भूमिका घेतात यावर राजकीय समीकरणे ठरणार आहेत. अमरावती-चिखली महामार्गाचे चौपदरीकरण, अशोक वाटिका-रेल्वेस्थानक उड्डाणपूल, अकोला-नांदेड महामार्ग, डाबकीमार्ग उड्डाणपूल, न्यू तापडिया नगर उड्डाणपूलसह अंतर्गत रस्त्यांसाठी कोटय़वधींच्या निधी मिळाला. अमरावती ते चिखलीपर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम मार्गी लावले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ८०० कि.मी.वर रस्ते करण्यात आले असून, अनेक पुलांची उभारणी करण्यात आली. अकोला-अकोट रेल्वेमार्ग ब्रॉडगेजचे काम गतीने पूर्णत्वास जात आहे. अकोट-खंडवा रेल्वेमार्गामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे अनेक अडचणी आल्या. त्यामुळे अद्यापही हे काम सुरू होऊ शकले नाही. केंद्र सरकारच्या निधीत राज्य शासनाचा वाटा टाकून सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. शिवणी विमानतळासाठी कृषी विद्यापीठाची जमीन घेतल्यावरही खासगी जमिनीचा तिढा कायम आहे. केंद्र शासनाच्या जलसमृद्धी योजनेतून सिंचन प्रकल्पांचे रखडलेले काम सुरू करण्यात आले. शहरात अमृत योजनेसह इतर योजनांमधून विकास कार्य राबविण्यात आले. शहरातील सिमेंट रस्त्यांचे मात्र निकृष्ट काम चव्हाटय़ावर आले. यातील दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई झाली नाही. प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला, सौभाग्य, जनधन, मुद्रा आदी केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी झाली. शेती, औद्योगिक विकास व खारपाणपट्टय़ाचे प्रश्न कायम आहेत. खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यातील गटबाजी अनेक वेळा विकासकामात अडसर ठरला. खा. संजय धोत्रे यांची पक्ष संघटनेवर मजबूत पकड आहे. तळागाळात कार्यकर्त्यांचे जाळे, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांची साथ, महापालिकेतील नगरसेवकांचे समर्थन, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व आदी खा. धोत्रेंच्या नेतृत्वाच्या जमेच्या बाजू आहेत. विरोधी गटाकडून लोकसभेमध्ये उमेदवार बदलण्याच्या वावडय़ाही उठवल्या जातात. मात्र, तशी शक्यता दिसत नाही. मुस्लीम, दलित, मराठा, कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या अकोला मतदारसंघात काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ आणि भाजप अशी तिरंगी लढत नेहमीच होते.

akola Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Dhotre Sanjay Shamrao
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Akola 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Ambedkar Prakash Yashwant
Vanchit Bahujan Aaghadi
0
Graduate Professional
64
5.87 Cr / 0
Arun Kankar Wankhede
Peoples Party of India (Democratic)
0
10th Pass
63
73.35 Lac / 1.25 Lac
Arun Manohar Thakare
IND
0
10th Pass
61
/ 0
Gajanan Onkar Harne
IND
0
12th Pass
50
42.7 Lac / 0
Hidayatulla Barakatulla Patel
INC
1
10th Pass
60
1.49 Cr / 4.84 Lac
Kamble Bhanudas Chokhoba
BSP
0
12th Pass
50
10.42 Lac / 0
Murlidhar Lalsingh Pawar
IND
0
Post Graduate
60
47.71 Lac / 0
Pravin Chandrakant Kaurpuriya
IND
0
Graduate Professional
44
5.4 Lac / 0
Sachin Ganpatlal Sharma
IND
0
10th Pass
39
3.14 Cr / 23.55 Lac
Sanjay Shamrao Dhotre
BJP
1
Graduate Professional
60
7.72 Cr / 1.5 Cr
Sau. Pravina Laxman Bhatkar
BMUP
0
Graduate Professional
58
1.67 Cr / 12 Lac

Akola सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
1999
Ambedkar Prakash Yashwant
BBM
40.53%
2004
Dhotre Sanjay Shamrao
BJP
42.61%
2009
Dhotre Sanjay Shamrao
BJP
38.91%
2014
Dhotre Sanjay Shamrao
BJP
46.65%
2019
Dhotre Sanjay Shamrao
BJP
49.53%

Akola मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
AKOTBharsakle Prakash GunvantraoBJP
BALAPURBaliram Bhagwan SirskarBBM
AKOLA WESTGovardhan Mangilal SharmaBJP
AKOLA EASTSavarkar Randhir PralhadraoBJP
MURTIZAPURHarish Marotiappa PimpleBJP
RISODAmeet Subhashrao ZanakINC

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X