Amit Thackeray Backed by BJP but Shinde Shivsena Supports Sada Sarvankar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे राज्यभर पडघम वाजत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती, आघाडीसह सर्वच पक्षांमध्ये जागावाटप, उमेदवार निवडीच्या कामांना वेग आला आहे. महायुतीतील पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि पर्यायाने भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता मनसे आणि महायुती मैत्रीपूर्ण लढती होतील का? महायुती किमान अमित ठाकरे यांना पाठिंबा देईल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अशातच मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मला वाटतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार आहे. ते यासंदर्भात निर्णय घेतील. यात महायुतीमध्ये कोणताही मतभेद नसला तरी यामुळे एक वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राची संस्कृती जपता येईल. असं नातं आपण दाखवलं पाहिजे. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. ते महायुतीचे उमेदवार आहेत, महायुती म्हणून निर्णय करावा हे माझं म्हणणं आहे”.

What Amit Thackeray Said About Raj Thackeray and Uddhav Thackeray?
Amit Thackeray : “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Devendra Fadnavis reaction on raj Thackeray CM statement
Devendra Fadnavis: “भाजपाचं सरकार येणार नाही…”, राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

हे ही वाचा >> २६ मतदारसंघांत ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ सामना रंगणार! ठाकरे-शिंदेंकडून उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर

शिवसेनेची (शिंदे) भूमिका काय?

दरम्यान, अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत महायुतीत दुमत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेनेने (शिंदे) माहीममध्ये आपला उमेदवार दिला आहे. तसेच शिवसेना (शिंदे) नेते आशिष शेलारांच्या मताशी सध्या तरी सहमत नाहीत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “माहीम विधानसभेबाबतचा निर्णय घेणे किंवा त्या मतदारसंघात अमित ठाकरे यांना पाठिंबा देणे हा खूप मोठा विषय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघाबाबतचा जो काही निर्णय असेल तो आमचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार घेतील”.

हे ही वाचा >> Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

उदय सामंत काय म्हणाले?

यसामंत म्हणाले, “अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मात्र, त्याचबरोबर विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विधानसभेचे तिकीट दिलं आहे. ही एकनाथ शिंदे यांची सरवणकरांप्रती असलेली कमिटमेंट आहे. कारण, सरवणकर यांनी पडत्या काळात एकनाथ शिंदे यांना आणि आम्हा सर्वांना सहकार्य केलं आहे. त्यामुळे सरवणकरांना डावलणं योग्य ठरणार नाही. याच भावनेतून एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. या संदर्भातील सर्व निर्णय हे एकनाथ शिंदे यांचे असतील, ते योग्य वेळी निर्णय घेतील”.