Maharashtra Assembly Election 2024 Total 2938 Candidates withdraw Candidatures : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता. या दिवसापर्यंत तब्बल ७,९९५ इच्छुक उमेदवारांनी १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र यामध्ये अनेक बंडखोर उमेदवारही होते. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरांची समजूत काढली. यापैकी अनेक बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तसेच, काहींचा निवडणूक लढण्याचा विचार बदलल्याने त्यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी (४ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दिली होती. त्यानुसार काल दुपारी तीन वाजेपर्यंत अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले.

३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर १०,९०५ पैकी शेकडो उमेदवारी अर्ज बाद झाले होते. पडताळणीनंतर ७,०७८ उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यापैकी २९३८ उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता ४,१४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये ४,१४० उमेदवारांमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> ‘राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत’, प्रॉपर्टीच्या विधानावरून संजय राऊत यांची टीका

गोपाळ शेट्टींची माघार

भाजपाचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी हे बोरीवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र सोमवारी त्यांनी माघार घेतली. देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. किरीट सोमय्या आणि विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोपाळ शेट्टींनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीवर होती. कार्यकर्त्यांची काळजी पक्ष घेतो. मला अनेक नेते भेटायला आले. गोपाळ शेट्टी यांना काय करायचं ते करु दे अशी भूमिका पक्षाने घेतली नाही. त्यामुळे मी माघार घेतो आहे असं गोपाळ शेट्टींनी जाहीर केलं. भाजपाने बोरीवलीत संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यानंतर गोपाळ शेट्टींनी बंड करत काहीही झालं तरीही निवडणूक लढणारच असं म्हटलं होतं. मात्र आज ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

भाजपाला मोठा धक्का, हिना गावितांचा पक्षाला रामराम; अक्कलकुव्यात शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान

अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुकांसमोर अनामत रक्कम वाचवण्याचे मोठे आव्हान

विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. परंतु, अर्ज सादर करताना भरलेली अनामत रक्कम वाचवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. कारण एकूण वैध मतांच्या तब्बल एक षष्ठांश मतं मिळाली तरच ही अनामत रक्कम परत मिळेल, अन्यथा ती जप्त केली जाते. यातील बहुतांश उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त होण्याचीच शक्यता मागील निवडणुकांचा अनुभव पाहिल्यास वर्तवण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्‍ये ११७ उमेदवार रिंगणात होते. त्‍यातील केवळ १७ उमेदवार अनामत रक्‍कम वाचवण्‍यात यशस्‍वी ठरले. तर १०० जणांची अनामत रक्‍कम जप्‍त झाली. अमरावती आणि धामणगाव रेल्‍वेमधून सर्वाधिक २१ उमेदवार रिंगणात होते. तेथील प्रत्‍येकी १९ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्‍त झाली. २०१४ च्‍या निवडणुकीत १३४ उमेदवार रिंगणात होते, यापैकी ११४ उमेदवारांना अनामत रक्‍कम वाचवता आली नव्हती.

Story img Loader