Ministers Assets Soar: विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर २९ ऑक्टोबर पर्यंत अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. यामध्ये विद्यमान २७ मंत्र्यांचाही समावेश आहे. अनेक मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये थोडीबहुत वाढ झालेली दिसत आहे. यापैकी तीन मंत्र्‍याच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मंत्रि‍पदाच्या काळात जमीन आणि फ्लॅट विकत घेतल्यामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या संपत्तीत ७७२ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१९ साली त्यांनी ३९ लाखांचे उत्पन्न दाखविले होते. यावेळी त्यांची संपत्ती ३.४ कोटींची असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संपत्तीमध्ये ११७ टक्क्यांची वाढ झाली आहे. सात कोटींहून त्यांची संपत्ती १५.५ कोटींवर पोहोचली आहे. मृदा आणि जल संधारण मंत्री संजय राठोड यांच्या संपत्तीतही २२० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. २०१९ साली त्यांची संपत्ती ५.९ कोटी इतकी होती, ती आता १५.९ कोटी इतकी झाली आहे.

raj thackerat latest news
राज ठाकरेंना आईच्या हातचं जेवण आवडतं की पत्नीच्या हातचं? शर्मिला ठाकरे पुढच्याच क्षणी म्हणाल्या अर्थात…
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, क्रीडा, युवक कल्याण आणि बंदर विकास मंत्री संजय बनसोड यांच्याही संपत्तीमध्ये १४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांनी यंदा पाच कोटींची संपत्ती जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यावर ईडीकडून भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांची चौकशीही झाली होती. छगन भुजबळ यांच्याही संपत्तीमध्ये १७ टक्के, तर हसन मुश्रीफ यांच्या संपत्तीत ३४ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.

हे वाचा >> CM Eknath Shinde Property: एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ, १३ कोटींवरून थेट ३७ कोटींपर्यंत पडली भर!

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत वाढ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपत्तीमध्ये १८७ टक्क्यांची वाढ झाली. २०१९ साली त्यांची संपत्ती ७.८१ कोटी होती, आता ती वाढून २२.४ कोटी इतकी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीमध्ये ४४ टक्के तर देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीमध्ये ५६ टक्क्यांची वाढ झाली, अशी माहिती निवडणूक अर्जाबरोबर भरलेल्या शपथपत्रातून समोर येत आहे.

या मंत्र्याची संपत्ती घटली

अनेक मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये कोट्यवधीची वाढ झालेली असताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीमध्ये मात्र घट झाली आहे. बांधकाम व्यावसायिक असलेल्या मंगल प्रभात लोढा (मलबार हिलचे आमदार) यांच्या संपत्तीमध्ये ११ टक्क्यांची घट झाली आहे.

आदिती तटकरेंच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदिती तटकरे यांनी आपल्या संपत्तीचे विवरण सादर केले. यात त्यांच्याकडे ११ लाख ३९ हजार रुपयांचे दागिने, तर रोहा तालुक्यातील दुरटोली येथे १२ एकर १६ गुंठे शेतजमिन असल्याचे नमुद केले आहे. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचेही शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. आदिती तटकरे यांनी २०१९ मध्ये निवडणूक आयोगालाच सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती ३९ लाख रुपये असल्याचं नमूद केला होत. पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत तीन कोटींची भर पडली आहे. त्यांची स्थावर मालमत्ता २ कोटी १६ लाख ५४ हजार एवढी असून, जंगम मालमत्ता १ कोटी २४ लाख ७६ हजार इतकी असल्याचे यावर्षी सादर केलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader