05 March 2021

News Flash

Bhandara Gondiya सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपने एकहाती यश मिळविले. पण त्यानंतर लगेचच झालेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा तसेच लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. गेल्या वर्षी पोटनिवडणुकीत मिळालेल्या यशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना बळ मिळाले असून, हा मतदारसंघ कायम राखण्यावर प्रफुल्लभाईंचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, पोटनिवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याकरिता भाजप सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी भंडारा-गोंदिया मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी झाले होते. कुकडे यांच्या विजयात माजी खासदार नाना पटोले यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. भाजपचा पराभव करण्याकरिता राष्ट्रवादी, काँग्रेससह सारे विरोधक एकटावले होते. कुकडे हे पोटनिवडणुकीत विजयी झाले असले तरी त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीने नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली आहे. ‘पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला विजय मिळाला असला तरी लोकसभा निवडणुकीत भाजपचाच खासदार निवडून येईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विदर्भाने भाजपला साथ दिली असली तरी गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली होती. गेल्या वर्षी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पदरी पराभव आला. शेतकऱ्यांची नाराजी आणि माजी खासदार नाना पटोले यांनी इतर मागासवर्गीयांवर भाजपकडून झालेला अन्यायाचा मुद्दा तापविला होता. आता लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ कायम राखण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान असेल. माजी खासदार नाना पटोले यांनी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला मदत केली होती. पटोले आताही अशीच मदत करतील का, यावरही चित्र अवलंबून असेल. २०१४ मध्ये लोकसभेची निवडणूकजिंकणारे पटोले आता विरोधी पक्षात असल्याने त्यांच्या इतका सक्षम ओबीसी नेता सध्या भाजपकडे नाही, मोदींची लाटही नाही उलट त्यांच्याविषयी नाराजी आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याचे या मतदारसंघावर लक्ष आहे. संघ आणि पक्षाची संघटनात्मक शक्ती हे येथे पक्षाचे बळ आहे. याशिवाय पटोले यांना धडा शिकवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच, असा निर्धार भाजपने केल्याने पक्ष या वेळी सर्व शक्ती पणाला लावण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल पराभवानंतरही मतदारांच्या संपर्कात असून पाच वर्षांत त्यांनी संघटनात्मक पातळीवरही लक्ष दिले आहे. काँग्रेससोबत झालेली युती त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली आहे. राजेंद्र पटले यांनी तेथे बंडखोरी केली आहे. भंडारा-गोंदियाची जागा २०१४च्या निवडणुकीत भाजपने जिंकली होती. २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ती परत मिळवली. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी बंडखोरी केल्याने येथे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. पटले पोवार समाजाचे प्रतिनिधित्व करतात व या समाजाचे मतदारसंघात लक्षणीय मते आहेत.

Bhandara Gondiya 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Bhimrao Duryodhan Borkar
Peoples Party of India (Democratic)
0
Post Graduate
67
6.1 Cr / 3.84 Lac
Devidas Santuji Lanjewar
IND
0
Graduate
61
47.8 Lac / 0
Dr. Sunil Sampat Chawale
IND
0
Doctorate
50
36.01 Lac / 75 Thousand
Dr. Vijaya Rajesh Nandurkar
BSP
0
Graduate Professional
37
3.63 Cr / 36.16 Lac
Gajbhiye Pramod Hiraman
IND
2
Graduate
46
1.13 Lac / 0
Jaiswal Virendrakumar Kasturchand
IND
0
Graduate Professional
63
3.68 Cr / 14 Lac
Kalchuri Nilesh
IND
0
10th Pass
45
50 Thousand / 0
Maraskolhe Bhojraj Isulal
Bhartiya Shakti Chetna Party
0
8th Pass
47
8.2 Lac / 0
Nana Jairam
NCP
0
10th Pass
64
5.75 Cr / 20.5 Lac
Nanhe Karu Nagoji
Vanchit Bahujan Aaghadi
0
Graduate Professional
68
59.95 Lac / 60 Thousand
Patle Rajendra Sahasram
IND
2
Others
56
3.25 Cr / 75 Lac
Suhas Anil Funde
IND
0
Post Graduate
29
1.5 Lac / 0
Sumit Vijay Pande
IND
0
Graduate Professional
38
7.45 Lac / 50 Thousand
Sunil Baburao Mendhe
BJP
2
Others
50
62.75 Cr / 1.99 Cr

Bhandara Gondiya सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Patel Praful Manoharbhai
NCP
47.52%
2014
Nanabhau Falgunrao Patole
BJP
50.63%
2019
Sunil Baburao Mendhe
BJP
52.23%

Bhandara Gondiya मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
TUMSARWaghamare Charan SovindaBJP
BHANDARAAvsare Ramchandra PunajiBJP
SAKOLIKashiwar Rajesh LahanuBJP
ARJUNI-MORGAONBadole Rajkumar SudamjiBJP
TIRORARahangdale Vijay BharatlalBJP
GONDIYAAgrawal Gopaldas ShankarlalINC

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X