05 March 2021

News Flash

Bhiwandi सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार

मुस्लीम, आगरी, कुणबी आणि आदिवासी बहुसंख्य असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात काही वर्षांपूर्वी भाजपचे अस्तित्व नव्हते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सद्दी होती. २०१४मध्ये नरेंद्र मोदी लाटेत या मतदारसंघाचाही राजकीय चेहरामोहरा बदलला आणि राष्ट्रवादीचे कपिल पाटील भाजपच्या तिकिटावर खासदार झाले. मागील पाच वर्षांत मात्र या मतदारसंघात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भिवंडी महापालिका हद्दीतील मतदारांनी नुकताच काँग्रेसला एकहाती कौल दिला आहे, तर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने खासदार पाटील आणि भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना धोबीपछाड दिला आहे. खासदार पाटील यांच्या एककल्ली राजकारणामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांना ते नकोसे झाले आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी तर पाटील पुन्हा निवडून येणे म्हणजे शिवसेनेचे अस्तित्व संपविणे, असाच प्रचार या भागात  सुरू केला आहे. त्यामुळे गेल्यावेळी मोदी लाटेवर स्वार होऊन निवडून आलेल्या पाटील यांना यंदाचा प्रवास सोपा जाणार नाही. कपिल पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळविले. भिवंडी आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षांत बेसुमार बेकायदा बांधकामे झाली आहेत. येथील अनधिकृत गोदामांमधून महिन्याला कोटय़वधी रुपयांचे भाडे कमवीत उजळ माथ्याने वावरणारे राजकारणी या भागाला नवे नाहीत. अश्विनी जोशी जिल्हाधिकारी असताना त्यांनी यापैकी काही गोदामांवर हातोडा फिरविण्यास सुरुवात करताच येथील राजकीय वर्तुळात पसरलेली अस्वस्थता या भागातील रहिवाशांनी अनुभवली आहे. त्यामुळे जेथे सत्ता तेथे लीन होणे येथील राजकीय नेतृत्वाला अधिक सोयीचे ठरते. खासदार पाटीलही या गोष्टीस अपवाद ठरलेले नाहीत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊ शकते हे ओळखून त्या दिशेने पावले उचलणाऱ्यांपैकी पाटील एक. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. शिवसेनेचीही या भागात पाळेमुळे घट्ट आहेत. हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याने या ठिकाणी काटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत. शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी सेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपचे विद्यमान खासदार पाटील यांच्याविरोधात दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नसली तरी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, यावरही मतदार संघातील निकालाचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेस -शिवसेना मनोमीलन कपिल पाटील गेली पाच वर्षे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत दोन हात करीत आहेत. महापालिका, जिल्हा परिषद अशा प्रत्येक निवडणुकीत पाटील आणि शिवसेना नेत्यांमध्ये संघर्ष झाला. या मतदारसंघातील भाजपचे आणखी एक वजनदार आमदार किसन कथोरे यांचाही बदलापूर, मुरबाड पट्टय़ात शिवसेनेशी संघर्ष असून शहापूर विधानसभा क्षेत्रात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने एकहाती बाजी मारत पाटील यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. यातूनच काँग्रेस आणि शिवसेनेत जवळीक वाढली. भिंवडी महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सत्तेत आहेत. खासदार पाटील यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही. माजी खासदार सुरेश टावरे आणि शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) या दोघांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. पाटील आणि म्हात्रे हे हाडवैरी म्हणून ओळखले जातात. त्यात म्हात्रे यांनी पाटील यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी बाळ्या मामा यांना उमेदवारीसाठी पाठिंब्याची पत्रे दिली असून उमेदवारीसाठी त्यांची दिल्लीवारी झाल्याचीही मतदारसंघात चर्चा आहे. नाराज शिवसैनिकांच्या मतांचे ध्रुवीकरण करणे म्हात्रे यांना शक्य होईल का याची चाचपणी सध्या काँग्रेसच्या गोटात सुरू आहे. सुविधांचा अभाव.. भिवंडी शहर असले तरी या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. अरुंद रस्त्यांवर उड्डाणपुलांची उभारणी केल्यामुळे वाहतूक कोंडी होते. हातमाग आणि यंत्रमाग कारखान्यांचा वीजेचा प्रश्न आहे. मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले असले तरी या ठिकाणी काम सुरू नाही. कल्याण-मुरबाड रेल्वे, रोजगार अशा मुद्दय़ांवर ही निवडणूक होणार आहे.

bhiwandi Lok Sabha Election 2019 Result

Name
Party
Status
Kapil Moreshwar Patil
BJP
WON
*The election result data is provided by C-Voter on a real time basis and is not altered or moderated by loksatta.com in any way.

Bhiwandi 2019 Candidate List

Candidate Name
Party
Criminal Cases
Education
Age
Assets / Laibilities (Rs.)
Ansari Mumtaz Abdul Sattar
Bahujan Republican Socialist Party
0
8th Pass
44
7.76 Lac / 0
Arun Damodar Savant
Vanchit Bahujan Aaghadi
0
Doctorate
69
5.09 Cr / 0
Balaram Vitthal Mhatre
IND
0
Literate
57
5.24 Lac / 0
Dr. Nooruddin Nizam Ansari
SP
1
Graduate Professional
44
22.38 Cr / 0
Engineer Navid Betab
IND
0
Graduate
41
51.03 Cr / 0
Feroz Abdurrahim Shaikh
Jan Adhikar Party
0
Graduate Professional
46
1.21 Cr / 2.36 Lac
Kapil Jayhind Patil
IND
0
8th Pass
35
15.92 Lac / 1.75 Lac
Kapil Moreshwar Patil
BJP
0
Graduate
58
41.89 Cr / 56.45 Lac
Kapil Yashwant Dhamane
IND
0
12th Pass
34
19.05 Lac / 0
Kishor Rambhauji Kinkar
Bharat Prabhat Party
1
Graduate
48
1.46 Cr / 5 Lac
Ku. Nitesh Raghunath Jadhav
IND
2
12th Pass
27
8.34 Lac / 0
Sanjay Ganapat Wagh
Bhartiya Tribal Party
0
12th Pass
28
2.37 Lac / 0
Shr. Deepak Pandharinath Khambekar
IND
0
10th Pass
53
19.48 Lac / 0
Suhas Dhananjay Bonde
IND
1
12th Pass
47
7.26 Cr / 27.67 Lac
Taware Suresh Kashinath
INC
1
12th Pass
62
32.45 Cr / 9.65 Lac

Bhiwandi सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल

* Bye Election Result
Year
Winner
Party
Vote%
2009
Taware Suresh Kashinath
INC
31.29%
2014
Kapil Moreshwar Patil
BJP
46.95%
2019
Kapil Moreshwar Patil
BJP
52.09%

Bhiwandi मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

Constituency Siting MLA Party
BHIWANDI RURAL (S.T.)Shantaram Tukaram MoreSHS
SHAHAPURBarora Pandurang MahaduNCP
BHIWANDI WESTChoughule Mahesh PrabhakarBJP
BHIWANDI EASTRupesh Laxman MhatreSHS
KALYAN WESTNarendra Baburao PawarBJP
MURBADKisan Shankar KathoreBJP

सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी

Just Now!
X