Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Candidates 2024 List : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

या यादीनुसार, आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम, अतुल भातखळकर यांना कांदिवली पूर्व, राम कदम यांना घाटकोपर पश्चिम, मीहिर कोटेचा यांना मुलूंड, गणेश नाईक यांना ऐरोली, रविंद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – मुरबाडमध्ये किसन कथोरेच भाजपचे उमेदवार; पक्षाअंतर्गत विरोधकांची कोंडी, पक्षांतरांच्या चर्चांनाही पूर्णविराम

मराठवाड्यातील १६ जागांसाठी उमेदवार जाहीर

भाजपाने मराठवाड्यातील १६ जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यापैकी भोकर आणि फुलंब्री हे दोन मतदारसंघ सोडले, तर उर्वरित १४ मतदारसंघात भाजपाने विद्यमान आमदारांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. फुलंब्री मतदारसंघात अनुराधा चव्हाण यांना, तर भोकर मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात गेले अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय भाजपाने संभाजीनगर किनवटमधून भीमराव केराम, नायगावमधून राजेश पवार, मुखेडमधून तुषार राठौड, हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे, जिंतुरमधून मेघना बोर्डीकर, परतूरमधून बबनराव लोणीकर, केजमधून नमिता मुंदडा, निलंगातून संभाजी पाटील निलंगेकर, बदनापूरमधून नारायण कुचे, भोकरदनमधून संतोष दानवे, औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे, गंगापूरमधून प्रशांत बंब, औसा- अभिमन्यू पवार आणि तुळजापूर राणाजगजीतसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा – दलित असल्याने महायुतीकडून छळ – रश्मी बर्वे; जातप्रमाणपत्र रद्द करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर

पुण्यातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा

भाजपाने पुण्यातील तीन मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना तर पर्वती विधानसभा मतदारसंघांमधून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पहिल्या यादीत भाजपाकडून १३ महिलांना संधी

भाजपाने नुकताच जाहीर केलेल्या पहिल्या यादीत १३ महिलांना संधी देण्यात आली आहे. श्रीगोंदामध्ये प्रतिमा पाचपुते, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, जिंतूर मेघना बोर्डीकर, गोरेगाव विद्या ठाकूर, बेलापूर मतदारसंघातून बेलापूर मंदा म्हात्रे, चिखली श्वेता महाले, दहिसर मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिम सीमा हिरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड, फुलंब्री अनुराधा चव्हाण आणि भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा – Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार की पाडणार? मनोज जरांगेंची मोठी घोषणा

भाजपाच्या उमदेवारांची संपूर्ण यादी :

मतदारसंघाचे नाव उमेदवार
१) नागपूर दक्षिण पश्‍चिमदेवेंद्र फडणवीस
२) कामठी चंद्ररशेखर बावनकुळे
३) शहादा (आजजा) – राजेश पाडवी
४) नंदुरबार (अजजा) विजयकुमार गावीत
५) धुळे शहर अनुप अग्रवाल
६) शिंदखेडा जयकुमार रावल
७) शिरपूर (अजजा) काशिराम पावरा
८) रावेर अमोल जावळे
९) भुसावळ (अजा) संजय सावकारे
१०) जळगांव शहर– सुरेश भोळे
११) चाळीसगाव मंगेश चव्हाण
१२) जामनेर गिरीश महाजन
१३) चिखली श्वेता महाले
१४) खामगांव आकाश फुंडकर
१५) जळगांव (जामोद) डॉ. संजय कुटे
16) अकोला पूर्व रणधीर सावरकर
१७) धामणगांव रेल्वे प्रताप अडसद
१८) अचलपूर प्रवीण तायडे
१९) देवळी राजेश बकाने
२०) हिंगणघाट समीर कुणावार
२१) वर्धा डॉ. पंकज भोयर
२२) हिंगणा समीर मेघे
२३) नागपूर-दक्षिण मोहन मते
२४) नागपूर-पूर्व कृष्णा खोपडे
२५) तिरोडा विजय रहांगडाले
२६) गोंदिया विनोद अग्रवाल
२७) आमगाव (अजजा) संजय पुराम
२८) आरमोरी (अजजा) कृष्णा गजबे
२९) बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार
३०) चिमूर बंटी भांगडिया
३१) वणी संजीवरेड्डी बोडकुरवार
३२) राळेगांव अशोक उइके
३३) यवतमाळ मदन येरावार
३४) किनवट भीमराव केराम
३५) भोकर श्रीजया चव्हाण
३६) नायगांव राजेश पवार
३७) मुखेड तुषार राठोड
३८) हिंगोली तानाजी मुटकुळे
३९) जिंतूर मेघना बोर्डीकर
४०) परतूर बबनराव लोणीकर
४१) बदनापूर (अजा) नारायण कुचे
४२) भोकरदन संतोष दानवे
४३) फुलंब्री अनुराधा चव्हाण
४४) औरंगाबाद पूर्व अतुल सावे
४५) गंगापूर प्रशांत बंब
४६) बागलान (अजजा) दिलीप बोरसे
४७) चंदवड डॉ. राहुल अहेर
४८) नाशिक पूर्व अॅड. राहुल ढिकाले
४९) नाशिक पश्चिम सीमा हिरे
५०) नालासोपारा राजन नाईक
५१) भिवंडी पश्चिम महेश चौघुले
५२) मुरबाड किसन कथोरे
५३) कल्याण पूर्व सुलभा गायकवाड
५४) डोंबिवली रवींद्र चव्हाण
५५) ठाणे संजय केळकर
५६) ऐरोली गणेश नाईक
५७) बेलापूर मंदा म्हात्रे
५८) दहिसर मनिषा चौधरी
५९) मुलुंड मिहिर कोटेचा
६०) कांदिवली पूर्व अतुल भातखळकर
६१) चारकोप योगेश सागर
६२) मलाड पश्चिम विनोद शेलार
६३) गोरेगाव विद्या ठाकूर
६४) अंधेरी पश्चिम अमित साटम
६५) विले पार्ले पराग अळवणी
६६) घाटकोपर पश्चिमराम कदम
६७) वांद्रे पश्चिम अॅड. आशिष शेलार
६८) सायन कोळीवाडा आर. तमिल सेल्वन
६९) वडाळा कालिदास कोळंबकर
७०) मलबार हिल मंगलप्रभात लोढा
७१) कोलाबा अ‍ॅड. राहुल नार्वेकर
७२) पनवेल प्रशांत ठाकूर
७३) उरण महेश बाल्दी
७४) दौंड अ‍ॅड. राहुल कुल
७५) चिंचवड शंकर जगताप
७६) भोसरी महेश लांगडे
७७) शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे
७८) कोथरूड चंद्रकांत पाटील
७९) पर्वती माधुरी मिसाळ
८०) शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील
८१) शेवगांव मोनिका राजळे
८२) राहुरी शिवाजीराव कार्डिले
८३) श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते
८४) कर्जत जामखेड राम शिंदे
८५) केज (अजा) नमिता मुंदडा
८६) निलंगा संभाजी पाटील निलंगेकर
८७) औसा अभिमन्यू पवार
८८) तुळजापूर राणा जगजीतसिंह पाटील
८९) सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख
९०) अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी
९१) सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख
९२) माण जयकुमार गोरे
९३) कराड दक्षिण अतुल भोसले
९४) सातारा शिवेंद्रराजे भोसले
९५) कणकवलीनितेश राणे
९६) कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक
९७) इचलकरंजी राहुल आवाडे
९८) मिरज सुरेश खाडे
९९) सांगली सुधीर गाडगीळ

खरं तर यंदा भाजपाकडून अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होूोती. मात्र, जी यादी जाहीर झाली आहे, त्यानुसार पक्षाने अनेक आमदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader