पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीने कोविड-१९ संबंधित मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन नवीन प्रचार रणनीती तयार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अंतर्गत, पक्ष लहान रॅली घेणार आहे आणि त्यांचे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण केले जाईल. भाजपाच्या सूत्रांनी मंगळवारी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि नेत्यांशी प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा केली. त्यानुसार सर्व रॅली डिजिटल असतील, ज्यामध्ये पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी थेट संबोधित करतील. छोट्या सार्वजनिक सभा आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्या जातील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेते २२ जानेवारीनंतर प्रचारात उतरणार आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाकडे पुरेशी संसाधने आहेत, असेही नड्डा म्हणाले आहेत. करोना विषाणू आणि त्याचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता निवडणूक आयोगाने थेट रॅली, सार्वजनिक सभा, रोड शो यासह इतर अनेक निर्बंध लादले आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp to hold rallies in hybrid mode in five poll bound states msr
First published on: 19-01-2022 at 07:43 IST