Goa Election Results : डबल इंजिनचं सरकार पुन्हा येणार ; मगोप आणि अपक्षांना देखील सोबत घेणार – प्रमोद सावंत

विजयी झाल्यानंतर माध्यमांना दिली आहे पहिली प्रतिक्रिया

goa cm pramod sawant
(संग्रहीत छायाचित्र)

गोव्यात भाजपा पुन्हा एकदा सत्तेच्या वाटेवर आहे, कारण मतमोजीणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत समोर आलेल्या निकालांवरून भाजपा सर्वात मोठा पक्ष दिसत आहे. भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील विजयी झाले असून, भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आजच राज्यपालांची भेट घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्रमोद सावंत यांनी विजयी झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे.

माझ्या मतदार संघामध्ये मी नसतानाही काम झालं, त्यासाठी माझ्या जिंकण्याचं संपूर्ण श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या पक्षाला जात आहे. भलेही कमी फरकाने असो मात्र विजयी झालो आहे. डबल इंजिनचं सरकार परत येणार. आम्ही मगोप आणि अपक्ष विजयी उमेदवारांना देखील सोबत घेणार आहोत.” असं प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

प्रमोद सावंत यांचा ५०० मतांनी विजय झाला आहे. गोव्यात भाजपाला सर्वाधिक मतं मिळाली असून त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक लागतो. अजूनही मतमोजणी सुरु आहे. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे. पणजी मतदारसंघातून भाजपाचे बाबुश मोन्सरात विजयी झाले आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp will form the government in goa we will take mgp and independent candidates with us goa cm pramod sawant msr

Next Story
UP Election: उत्तर प्रदेशात भाजपा विजयाच्या दिशेने, जाणून घ्या निवडणुकीत काय दिली होती आश्वासनं
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी