अटीतटीच्या ठरलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी बाजी मारली आहे. येथे फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे. विद्यमान खासदार राजन विचारे १ लाख ७४ हजाराच्या फरकाने हरले आहेत. तर, दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही मोठ्या फरकाने जिंकून आले आहेत. दोन्ही मतदारसंघ हे सेनेचे बालेकिल्ले आहेत. या दोन्ही मतदारसंघात शिंदे गटाने बाजी मारल्याने एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, महाराष्ट्रातील काही मतदारसंघात शिंदे गटाचा दारुण पराभव झाराय. याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते आज माध्यमांशी बोलत होते.

ठाण्याच्या विकासाला जनतेने मतदान केलं

“ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा, धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला, बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम असलेला हा ठाणे जिल्हा आहे. यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रुपाने डौलाने फडकतोय. सर्वसामान्य कार्यकर्त्याला या मतदासंघामधून उमेदवारी दिली. सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित ठेवला. ठाण्यात जनतेने विकासाला मतदान केलं. ठाण्यात झालेला विकास आणि केलेलं काम, राज्य सरकारने केलेलं काम, दहा वर्षांचं काम याची पोचपावती या विजयात मतदारांनी दिली आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

A letter from the people of Nagpur on the occasion of Devendra Fadnavis birthday nagpur
“उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपण नागपूरकरांना वाळीतच टाकले…” देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्राची सर्वत्र चर्चा
union home minister amit shah likely to kolhapur for inauguration with condition
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेची अशी ही ‘झाडा’झडती; उद्घाटनासाठी येण्याकरीता १० हजार झाडे लावण्याची सक्ती
mamata banerjee on samvidhaan hatya diwas
संविधान हत्या दिन: अमित शाहांच्या घोषणेबाबत प्रश्न विचारताच ममता बॅनर्जी काही क्षण थांबल्या, नंतर म्हणाल्या…
Kalyan East Assembly Constituency BJP aspirant Narendra Pawar from Kalyan Paschim is likely to get candidature print politics news
कारण राजकारण: शिंदे गायकवाड बेबनावामुळे पवारांचे ‘कल्याण’?
Eknath Shinde
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिलांबरोबर तलाठ्यांकडून अरेरावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला इशारा; म्हणाले…
Rahul Gandhi displeasure as some comments in the speech were removed from the minutes
जे बोललो ते सत्यच! भाषणातील काही टिप्पण्या इतिवृत्तातून काढून टाकल्याने राहुल गांधी यांची नाराजी
Vidhan Parishad Adhiveshan Devendra Fadnavis Ambadas Danve
अंबादास दानवेंवरील कारवाईच्या प्रस्तावावर चर्चेला नकार दिल्याने विरोधकांचा गोंधळ, फडणवीस संतापले, नेमकं काय घडलं?
Lok Sabha Election Result 2024 PM Modi VS Rahul Gandhi
“राहुल गांधींसारखं वागू नका”, नरेंद्र मोदींचा एनडीएतल्या खासदारांना सल्ला

जनतेने तडीपार केलं

“ठाणेकरांनी ठाकरे गटाची जागा त्यांना दाखवली आहे. ठाणेकरांनी त्यांचा कार्यक्रम केला आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही अभिनंदन करतो. कारण ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. लवकरच मोदींच्या नेतृत्त्वात एनडीएचं सरकार बनेल. मोदीद्वेषाने पछाडलेले लोक त्यांना तडीपार करू असं म्हणत होते. जे ही भाषा वापरत होते, त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केले आहे. विकासाचे राजकारण आम्ही करतो त्यामुळे जनतेने पुन्हा मोदींना पसंती दिली, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“काही जागा कमी मतांनी गेल्या आहेत. कारण, काही ठिकाणी जागा जाहीर करायला उशीर झाला. अपप्रचार आणि संभ्रम करण्यात आला आहे त्या त्रुटी आम्ही दूर करू”, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. “डॉ. श्रीकांत शिंदे याचा विजय झाला. त्यांनी १० वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती कल्याण लोकसभा मतदार संघातील जनतेने दिली आहे”, असं म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदेचे अभिनंदन केले.