Chandrapur सार्वत्रिक निवडणूक निकाल / उमेदवार
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ गेल्या १५ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. काँग्रेसमधील गटबाजी तसेच बसपा किंवा अन्य छोटय़ा पक्षांकडून होणारे मतविभाजन भाजपच्या पथ्यावरच पडले आहे. या वेळीही चित्र फार काही बदलेल अशी चिन्हे नाहीत. चंद्रपूर जिल्हय़ातील चार व यवतमाळ जिल्हय़ातील दोन अशा सहा विधानसभा मतदार संघांचा या मतदार संघात समावेश होतो. कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदार संघात जवळपास १८ लाख मतदार आहेत. येथे एकूण सहापैकी पाच आमदार भाजपचे तर एक शिवसेनेचा आहे. या मतदार संघावर भाजपने २००९ पासून पकड घट्ट केली आहे. कॉंग्रेस आघाडी सरकारचा कोळसा घोटाळा उघडकीस आणून लोकप्रिय झालेले विद्यमान खासदार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर १९९६ मध्ये प्रथम लोकसभेत निवडून गेले. कॉंग्रेस नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या बंडखोरीमुळे अहिर यांना तेव्हा तत्कालीन केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचा पराभव करता आला होता. त्यानंतर १९९८ च्या निवडणुकीत मात्र कॉंग्रेसचे वामनराव गड्डमवार व नरेश पुगलिया गटाचे मनोमीलन झाल्याने ९८ व ९९ अशा सलग दोन्ही निवडणुका नरेश पुगलिया यांनी सहज जिंकल्या. मात्र २००४ मध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षात बंड झाले व राजेंद्र वैद्य बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरले. या मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळाला व हंसराज अहिर पुन्हा लोकसभेत गेले. त्यानंतर अहिर यांनी कधीच मागे वळून बघितले नाही. २००४, २००९ व २०१४ अशा सलग तीन निवडणुका अगदी सहज जिंकल्या. विशेष म्हणजे, या तिन्ही निवडणुकांमध्ये कधी राजेंद्र वैद्य तर कधी शेतकरी संघटना व आम आदमी पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अॅड. वामनराव चटप यांनी लाखावर तर बहुजन समाज पक्षाचे अॅड. दत्ता हजारे यांनी हजारो मते घेतली. २०१४ मध्ये विरोधात निवडणूक लढलेले कॉंग्रेसचे माजी मंत्री संजय देवतळे आता भाजपवासी झाले आहेत. त्रिकोणी व बहुरंगी लढतीत झालेल्या मतविभाजनाचा फायदा नेहमीच अहिर यांना मिळत गेला आणि त्यांचा विजय अधिक सोपा होत गेला. आता परिस्थिती बदलली आहे. अहिर यांनी १५ वर्षांत शेतकरी, रोजगार, उद्योगधंदे, प्रदूषण, शिक्षण यापैकी एकाही प्रश्नावर गांभीर्याने काम केले नाही. त्याचा परिणाम त्यांच्याविषयी शहर व ग्रामीण अशी दोन्ही भागात काही प्रमाणात नाराजी आहे. याच नाराजीचा सामना त्यांना वणी, आर्णी व चंद्रपुरातील बंगाली कॅम्पमध्ये करावा लागला होता. आता तर मतदार उघडपणे माणूस चांगला असला तरी विकास कामे झाली नाहीत ही नाराजी बोलून दाखवितात. प्लास्टिक इंजिनीअरिंग सुरू केले मात्र भद्रावती येथे कोळशापासून युरिया प्रकल्पाची घोषणा हवेतच विरली. औद्योगिक नगरी असतानाही आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टीने विशेष प्रकल्पावर काम झाले नाही. सर्वाधिक रेल्वे थांबे देण्यात मात्र ते यशस्वी ठरले. सिकलसेल व थॅलेसेमियावर कामाला सुरुवात झाली. परंतु हॉस्पिटल झाले नाही. संघटनात्मक बळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता हे अहिर यांच्यासाठी बलस्थान आहे. असे असले तरी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर वाढलेली कटुता हा मुद्दा अहिर यांना सतावू शकतो.
chandrapur Lok Sabha Election 2019 Result
Chandrapur 2019 Candidate List
Chandrapur सार्वत्रिक निवडणूक आधीचे निकाल
Chandrapur मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ
सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी
Maharashtra अन्य मतदारसंघ
- AHMADNAGAR
- AKOLA
- AMRAVATI
- AURANGABAD-M
- BARAMATI
- BEED
- BHANDARA - GONDIYA
- BHIWANDI
- BULDHANA
- CHANDRAPUR
- DHULE
- DINDORI
- GADCHIROLI-CHIMUR
- HATKANANGLE
- HINGOLI
- JALGAON
- JALNA
- KALYAN
- KOLHAPUR
- LATUR
- MADHA
- MAVAL
- MUMBAI SOUTH
- MUMBAI NORTH
- MUMBAI NORTH CENTRAL
- MUMBAI NORTH EAST
- MUMBAI NORTH WEST
- MUMBAI SOUTH CENTRAL
- NAGPUR
- NANDED
- NANDURBAR
- NASHIK
- OSMANABAD
- PALGHAR
- PARBHANI
- PUNE
- RAIGAD
- RAMTEK
- RATNAGIRI - SINDHUDURG
- RAVER
- SANGLI
- SATARA
- SHIRDI
- SHIRUR
- SOLAPUR
- THANE
- WARDHA
- YAVATMAL-WASHIM