उद्या (१ जून) लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडणार असून मतदान संपताच निवडणुकीचा एझिक्ट पोल जाहीर होणार आहे. या एक्झिट पोलकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे. मात्र, एझिक्ट पोल जाहीर झाल्यानंतर माध्यमांवर होणाऱ्या कोणत्याही चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – Loksabha Poll 2024 : निकालापूर्वी काँग्रेसकडून जल्लोषाची तयारी; १ क्विंटल लाडूची दिली ऑर्डर

mamata banerjee on samvidhaan hatya diwas
संविधान हत्या दिन: अमित शाहांच्या घोषणेबाबत प्रश्न विचारताच ममता बॅनर्जी काही क्षण थांबल्या, नंतर म्हणाल्या…
Petition, Rahul Gandhi,
राहुल गांधी, उद्धव ठाकरे, राऊत यांच्या विरोधात याचिका; मतदान यंत्राबाबत खोट्या, दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा दावा
Case, Special Public Prosecutor,
माजी आमदाराच्या तक्रारीवरून विशेष सरकारी अभियोक्त्याविरोधात गुन्हा, १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
Criticism of Prime Minister Narendra Modi Injustice to the underprivileged by Congress
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; काँग्रेसकडून वंचितांवर अन्याय
Rahul Gandhi displeasure as some comments in the speech were removed from the minutes
जे बोललो ते सत्यच! भाषणातील काही टिप्पण्या इतिवृत्तातून काढून टाकल्याने राहुल गांधी यांची नाराजी
Parliament Session 2024 LIVE Updates in Marathi
“माझ्या भाषणातील काही भाग वगळणं हे लोकशाही तत्त्वाच्या विरोधात”, राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; म्हणाले..
first Parliament session of the 18th Lok Sabha Resurgent Opposition to push government
नव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन गाजणार या मुद्द्यांवरुन; विरोधकांनी अशी केली आहे तयारी
Action on fake Kunbi certificates All party meeting to decide on issues of OBC
खोट्या कुणबी प्रमाणपत्रांवर कारवाई; ओबीसींच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. उद्या जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलसंदर्भात माध्यमांवर होणाऱ्या कोणत्याही चर्चेत काँग्रेस पक्ष सहभागी होणार नाही, असे ते म्हणाले. तसेच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होईल, तेव्हा तो निकाल सर्वांसमोर असेल. केवळ माध्यमांच्या टीआरपीसाठी अशा कोणत्याही चर्चेत सहभागी होण्याचं समर्थन आम्ही करत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पुढे बोलताना ४ जूनच्या निकालानंतर माध्यमांवर होणाऱ्या चर्चेत काँग्रेस पक्ष आनंदाने सहभागी होईल, असंही त्यांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्प्याचे मतदान शनिवारी संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच ६.३० वाजल्यापासून विविध वाहिन्यांवर एक्झिट पोलच्या निकाल येण्यास सुरुवात होईल. या ‘एक्झिट पोल’ वरून लोकांनी निवडणुकीत कशाप्रकारे मतदान केले याचा एक अंदाज येणार आहे.

हेही वाचा – जयराम रमेश यांचा दावा, “४ जूनला आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार आणि पंतप्रधानपदी..”

सध्या लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले असून, १ जून रोजी सातव्या व शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल आहे आणि त्या दिवशी कोणाचे सरकार स्थापन होईल हे स्पष्ट होणार आहे.