Congress Ghulam Ahmad Mir Promises LPG cylinders to all in Rs 450 : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा नुकताच (१३ नोव्हेंबर) पार पडला आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. तर या मतदारसंघांमध्ये (दुसऱ्या टप्प्यातील) उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या त्या मतदारसंघांमध्ये फिरू लागले आहेत. प्रचारसभा, प्रचारफेऱ्या घेऊ लागले आहेत. दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि झारखंड काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर हे एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी व विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मीर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. गुलाम अहमद मीर यांनी जनतेला आश्वासन देताना म्हटलं आहे की “आमचा पक्ष सत्तेत आल्यावर आम्ही सर्व नागरिकांना ४५० रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर देऊ. घुसखोरांनाही त्यात सामावून घेऊ. झारखंडच्या सर्व नागरिकांना समावून घेऊ.

बेरमो विधानसभा मतदारसंघातील चंद्रपुरा भागात गुरुवारी (१४ नोव्हेंबर) काँग्रेसची एक प्रचारफेरी पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गुलाम अहमद मीर म्हणाले, आम्ही जनतेला आश्वासन दिलं आहे की “जर आमचं सरकार आलं तर आम्ही १ डिसेंबरपासून सर्वांसाठी ४५० रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊ. ही योजना सामान्य नागरिकांसाठी असेल. तुम्ही हिंदू असा अथवा मुसलमान किंवा घुसखोर… सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल. झारखंडच्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. कोणावरही अन्याय केला जाणार नाही”.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हे ही वाचा >> Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका

भाजपाकडून सडकून टीका

गुलाम अहमद मीर यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाला काँग्रेसला घेरण्याची संधी मिळाली आहे. मीर यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने म्हटलं आहे की “हे काँग्रेसचं तुष्टीकरण्याचं आणि ध्रुवीकरणाचं राजकारण आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारचं राजकारण करत आले आहेत. हे काँग्रेसचं व्होटबँकेचं राजकारण आहे”.

हे ही वाचा >> Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!

२० नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार

झारखंडमध्ये येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या टप्प्यात एकूण ४३ मतदारसंघांचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी राज्यातील एक कोटी ३७ लाख मतदारांपैकी ६६.१८ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात लोहरदगा जिल्ह्यात ७३.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर, हजारीबाग मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली येथील. ६२.७८% मतदारांनी आपला हक्क बजावला.

Story img Loader