Congress Suspends Rebel Candidates in Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांविरोधात पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. काँग्रेसने राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी करणाऱ्या १६ जणांना निलंबित केलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कसबा, शिवाजीनगर, पर्वती, गडचिरोली, भंडारा, भिवंडी, मिरा-भाईंदर, अहमदनगर शहर, कोपरी-पाचपाखाडी, यवतमाळ, राजापूर, काटोल या मतदारसंघातील बंडखोरांनी माघार घेतली नाही. अखेर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईआधी काँग्रेसने अनेक बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या.

काँग्रेसच्या वरिष्ठांनी केलेल्या मनधरणीनंतर काही बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर काहींनी या मनधरणीला जुमानलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला.या कारवाईपूर्वी बंडखोरांना पक्षाने नोटिसा देखील बजावल्या होत्या. मात्र १६ बंडखोरांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हे ही वाचा >> Raj Thackeray : “ती बातमी आली अन्…”, राज ठाकरेंनी सांगितली अमित ठाकरेंना निवडणुकीला उभं करण्यामागचं कारण

निलंबित केलेल्या बंडखोर नेत्यांची यादी

विधानसभा मतदारसंघबंडखोर उमेदवार
आरमोरीआनंदराव गेडाम, शिलू चिमूरकर
गडचिरोलीसोनल कोवे, भरत येरमे
बल्लारपूरअभिलाषा गावतूरे, राजू झोडे
भंडाराप्रेमसागर गणवीर
अर्जुनी मोरगावअजय लांजेवार
भिवंडीविलास रघुनाथ पाटील, आसमा जव्वाद चिखलेकर
मीरा भाईंदरहंसकुमार पांडे
कसबा पेठकमल व्यवहारे
पलूस कडेगावमोहनराव दांडेकर
अहमदनगर शहरमंगल विलास भुजबळ
कोपरी पाचपाखाडीमनोज शिंदे, सुरेश पाटीलखेडे
उमरखेडविजय खडसे
यवतमाळशबबीर खान
राजापूरअविनाश लाड
काटोलयाज्ञवल्क्य जिचकार
रामटेकराजेंद्र मुळक

Story img Loader