शरद पवारांसारख्या माणसाला देवेंद्र फडणवीस यांची जात काढावी लागते. कारण शरद पवारांसारख्या माणसाला एकच व्यक्ती पुरुन उरला आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. महायुतीतल्या नेत्यानेच हे वक्तव्य केलं आहे. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना महायुतीतल्या नेत्याने हे वक्तव्य केलं आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशात प्रचारसभांचा आणि रॅलीजचा धडाकाही सुरु झाला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत महाराष्ट्रात आहे. महायुतीने ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. अशात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं हे काही नवीन नाही. रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना करत एकटे फडणवीस पवारांना पुरुन उरले आहेत असं म्हटलं आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
ajit pawar sharad pawar
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”
Lok Sabha Election 2024 News in Marathi
Video: महाराष्ट्रातील पाच दिग्गज नेते आणि लोकसभेची कसोटी…पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

“७० वर्षांपासून महाराष्ट्रात मूठभर सरदारांचं राज्य होतं. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळेच शरद पवारांसारख्या नेत्याला त्यांची जात काढावी लागते. पण पवार तुमची जात वेगळी असती, तुमचं आडनाव फडणवीस असतं तर महाराष्ट्रात तुम्हाला कुणी हुंगलंही नसतं. मात्र देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा आहे जो शरद पवारांना पुरुन उरला. त्यामुळे या वयातही शरद पवारांना खोटं बोलत रेटून चालावं लागतं आहे.”

हे पण वाचा- आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल : म्हणाले, ‘अटकेच्या भीतीनेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० गद्दार भाजपसोबत..’

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळेल

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश संपादन होईल, असं चित्र निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने मंतरलेला प्रदेश आहे. महापुरुषांचे नाव घेणारी माणसं सध्या वाड्यामध्ये आहेत. आत्ताची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उध्वस्त होणार आहेत. रयतेचा विजय निश्चितपणे होणार आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.