Delhi MCD Exit Poll: रविवारी ४ डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत ५०.४७ टक्के मतदान झालं आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत २५० प्रभागांमध्ये एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्व उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये कैद झालं आहे. या निवडणुकीचा निकाल ७ डिसेंबरला लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी, या निवडणुकीचा एक्झीट पोल समोर आला असून आम आदमी पार्टीने भाजपासह काँग्रेसला जोरदार धक्का दिल्याचं चित्र आहे. ‘इंडिया टुडे’साठी ‘अॅक्सिस माय इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला ४३ टक्के मतदान झालं असून १४९ ते १७१ जागांवर ‘आप’चा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्ली महापालिकेची एकहाती सत्ता आम आदमी पार्टीकडे जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- Gujarat Election Exit Polls : भाजपा, काँग्रेस की आप? गुजरातमध्ये कोण बाजी मारणार, कोणाला किती जागा? वाचा एक्झिट पोल…

या निवडणुकीत भाजपाला ३५ टक्के मतदान झालं असून ६९ ते ९१ जागांवर भाजपा विजयी होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाने आपला मतदार कायम राखला आहे. मात्र, दिल्लीत काँग्रेसचं प्रचंड नुकसान झाल्याचं चित्र आहे. काँग्रेसला १० टक्के मतदान झालं असून ३ ते ७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi election exit poll live result bjp aap congress vote share arvind kejriwal rmm
First published on: 05-12-2022 at 18:42 IST