BJP Devendra Fadnavis Assets : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आहे. याचे संपूर्ण यश देवेंद्र फडणवीसांना दिले जात आहे. तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण किती मालमत्ता आहे? किंवा त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे, हे माहीत आहे का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी देवेंद्र फडणवीस यांनी २५ ऑक्टोबर रोजी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्जाबरोबर जोडलेल्या शपथपत्रात फडणवीसांनी आपल्या मालमत्तेसह इतर बाबींची माहिती दिली आहे. याच शपथपत्रात सांगितलेल्या माहितीच्या आधारे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण मालमत्ता किती आहे, हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : “कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा

देवेंद्र फडणवीसांची एकूण मालमत्ता

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकूण ५.२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे ५६ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि ४.६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून, त्यात शेतजमीन आणि निवासी मालमत्तेचाही समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुटुंबातील इतर एकाही सदस्याच्या नावे कार नसल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

अमृता फडणवीसांची एकूण मालमत्ता

देवेंद्र फडणवीसा यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावे ७.९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये ६.९ कोटी जंगम मालमत्ता आणि ९५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

हेही वाचा : अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश

फडणवीस दाम्पत्याकडे सुमारे १३ कोटींची संपत्ती आहे. शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीसांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून ६२ लाखांचे कर्ज घेतले आहे. तसेच अॅक्सिस बँक आरोपप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोर्टात केस केल्याची नोंदसुद्धा या शपथपत्रात केली आहे.

देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. २००९ पासून ते सलग निवडून येत आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. नुकतेच एका प्रचारादरम्यान त्यांनी आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आपण एकटे मुख्यमंत्री आहोत, ज्याचे मुंबईच स्वत:चे घर नाही, असे बोलून दाखवले.
ते म्हणाले, “महाराष्ट्रात आजवर २० मुख्यमंत्री झाले. या २० मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याचे मुंबईत स्वतःचे घर नाही. आजही माझे घर नागपूरमध्येच आहे आणि मला नागपूरकर असल्याचा अभिमान आहे.”

Story img Loader