काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापुरातून प्रणिती शिंदे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीतला पराभव भाजपाला दिसू लागला आहे. त्यामुळेच मोदींनी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या सभा वाढवल्या आहेत असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मटण खाणारे ब्राह्मण असाही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

“भाजपाने गेल्या दहा वर्षांत पाप केलं आहे. महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं आहे. बेरोजगारांचा देश अशी आपली ओळख झाली आहे. गरीबांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. या मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून आता काँग्रेसने ६० वर्षांत काय केलं वगैरे म्हणत आहेत. सातत्याने हा प्रयत्न नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडून केला जातो आहे.”

lok sabha elections 2024 rahul gandhi attacks bjp over dynasty politics
मंत्रिमंडळ नव्हे ‘परिवार मंडळ’; मंत्र्यांच्या घराणेशाहीवर बोट, राहुल गांधी यांची टीका
Dr Srikant Shinde as group leader of Shiv Sena
डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी
nirbhay bano campaign and Constitution benefits for Congress OBC Dalit Muslim community vote for Pratibha Dhanorkar
चंद्रपूर: ‘निर्भय बनो’, ‘संविधान’चा फायदा काँग्रेसला; ओबीसी, दलित, मुस्लीम समाजाची गठ्ठा मते धानोरकरांना
bjp leader jagannath patil marathi news
मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांची भाजपमधून हकालपट्टी करा, भाजप नेते जगन्नाथ पाटील यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
Varun Pathak demanded from Devendra Fadnavis to action against corrupt officials in sand theft
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संतापून म्हणाले, “मोक्का लावा पण यांना सोडू नका…”
Sambit Patra BJP Puri Lok Sabha elections Lord Jagannath is PM Modi bhakt
“भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त” या वक्तव्याचा संबित पात्रा यांना पुरी मतदारसंघात फटका बसेल का?
ramdas athawale Yogi Adityanath 1
“रावण डॅशिंग होता म्हणून…”, पटोलेंच्या आदित्यनाथांवरील टीकेला आठवलेंचं उत्तर; म्हणाले, “रावणाने लंका जाळली…”
anil deshmukh
“देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?” ‘त्या’ विधानावरून अनिल देशमुखांचा सवाल!

हे पण वाचा लोकसभा निवडणूक हातून निसटत असल्याने मोदी घाबरले, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

२०१९ मध्ये मोदींनी आश्वासनं दिली होती त्याचं काय झालं?

“२०१९ मध्ये नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते तेव्हा लष्कराचे गणवेश शिवण्यासाठी केंद्र उभं करणार म्हणाले होते. सोलापूरमध्ये आता आले तेव्हा त्या वचनावर काहीच का बोलले नाहीत? दोन उड्डाण पुलांचा उल्लेख त्यांनी केला होता. सोलापूरचा आवाजच दिल्लीत आला नाही. २०१४ आणि २०१९ चे दोन्ही खासदार मौन राहिले. प्रणिती शिंदे या जागरुक उमेदवार आहेत.” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींच्या सभेत ४०० रुपये देऊन कर्नाटकांतून लोक आणले गेले होते. तर राहुल गांधींच्या सभेत उत्स्फूर्तपणे लोक आले होते. लोक आता मोदींचं भाषण आणि त्यांचे मुद्दे ऐकून कंटाळले आहेत, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस मटण खाणारे ब्राह्मण

“ब्राह्मणांना शाप देण्याचा अधिकार आहे. हे आम्ही पोथी आणि पुराणांमध्ये वाचलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मटण खाणारे ब्राह्मण आहेत. त्यांचा शाप आम्हाला लागणार नाही.” असं नाना पटोले म्हणाले. त्यांना पत्रकाराने विचारलं की तुम्ही फडणवीसांना मटण खाताना पाहिलंय का? त्यावर पटोले म्हणाले, “आम्ही एकत्र मटण खाल्लं आहे.”

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?

माळशिरसच्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “एक तुम्हाला सांगतो मी कुणाच्या वाट्याला जात नाही, कुणाला त्रासही देत नाही. पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही. माझा इतिहास तपासा. मी काहीच करत नाही, मी राजकारणीच नाही. त्यामुळे मला ते छक्के-पंजे हे काही जमत नाही. याला गाड, त्याला पाड हे कधीच केलं नाही. आई तुळजाभवानीचा आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आपल्याशी विश्वासघात केला की सत्यानाश झालाच, होतोच.”