पाच राज्यंच्या विधानसभा निवडणुकांमुळे सध्या देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्राच्या बाजूलाच असलेल्या गोव्यामध्ये प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असून १४ फेब्रुवारी म्हणजे उद्या गोव्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील अनेक मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा ही उत्पल पर्रीकर यांच्या भूमिकेविषयी असून त्याबद्दल आता भाजपाच्या प्रचाराची गोव्यात धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनातलं ‘दु:ख’ बोलून दाखवलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“काँग्रेसला पर्रीकरांवर बोलण्याचा अधिकार आहे का?”

उत्पल पर्रीकरांच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. “विरोधकांना हे म्हणण्याचा अधिकार नाही की बाबुशसारख्या गुन्हेगाराला तिकीट दिलं. काँग्रेसचे खासदार सारदीन हे मनोहर पर्रीकरांबद्दल बोलताना म्हणतात की सुखाने मेला नाही. ते खोटं बोलले म्हणून त्यांच्या नाकात नळ्या टाकाव्या लागल्या. अशा प्रकारचं लाजिरवाणं वक्तव्य करणाऱ्या विरोधकांना मनोहर पर्रीकरांबद्दल बोलण्याचा अधिकार तरी आहे का?”, असं फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Shiv Sena Thackeray group leader Anil Parab
“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”

“संजय राऊत जे बोलतात त्यामुळे आमचं मनोरंजन होतं”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला!

“उत्पलनं तिकीट नाकारलं, भाजपानं नाही”

दरम्यान, उत्पल पर्रीकरांना भाजपानं तिकीट नाकारलं नसल्याच्या उक्तीचा फडणवीसांनी यावेळी पुनरुच्चार केला. “पर्रीकर परिवारासोबत, मनोहर पर्रीकरांसोबत आमचं एक भावनिक नातं आहे. त्यामुळे त्यांचं कुटुंब हे आम्हाला आमचं कुटुंब वाटतं. जेव्हा उत्पलनं निवडणूक लढण्याची इच्छा दाखवली, तेव्हा आम्ही त्याला तीन पर्याय दिले. त्यातला एक पर्याय तर असा होता जी जागा सातत्याने भाजपा जिंकतेय. याहीपलीकडे जाऊन त्याला असं आश्वासन दिलं की आत्ता तू निवडून ये, पाच वर्षांनी तुला पुन्हा पणजीमधून तिकीट देऊ. तरी त्यानी ऐकलं नाही,. त्यामुळे भाजपानं उत्पलला तिकीट नाकारलेलं नाही. भाजपाचं तिकीट उत्पलनं नाकारलं आहे ही वस्तुस्थिती आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“आदित्य ठाकरेंना इतिहास माहिती नाही”, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कुणी कुणाच्या पाठीत खंजीर…”!

उत्पल पर्रीकरांबाबत फडणवीसांची खंत

उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी यावेळी खंत व्यक्त केली. “२०१७ साली बाबुशला पणजी डेव्हलपमेंट असोसिएशनचा अध्यक्ष मनोहर पर्रीकरांनीच केलं. मग बाबुश वाईट असते, गुन्हेगार असते तर २०१७मध्ये मनोहर पर्रीकरांनी त्यांना का आणलं असतं? मनोहर पर्रीकर गेल्यानंतर पोटनिवडणुकीत पणजीच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं. तरी ते भाजपामध्ये आले. त्यांच्यासोबत तुम्ही ३ वर्ष सरकार चालवलं. तेव्हा कुणी हे बोललं नाही की तुम्ही त्यांना का घेतलं, ते गुन्हेगार आहेत. आत्ता तुम्ही हे बोलता. मनोहर पर्रीकर हे संघटनेनं निर्णय घेतला की ऐकायचे. आमची अपेक्षा तीच होती की उत्पलनंही पक्षाला वेठीला न धरता पक्ष जर आपल्या भल्याचा विचार करतोय, तर ते ऐकायला हवं होतं. ते त्यानं ऐकलं नाही याचं आम्हाला दु:ख आहे”, असं फडणवीस म्हणाले.